-
एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी 'देवमाणूस' ही मालिका झी मराठीवर आली, आणि अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.
-
अल्पावधीतच लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या या मालिकेतील प्रमुख कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं.
-
या मालिकेच्या निमित्ताने अतिशय रंजक मर्डर मिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे.
-
आता ही मालिका एका निर्णायक आणि रंजक टप्प्यावर आली आहे.
-
'देवमाणूस' या मालिकेत डिंपलची भूमिका साकारणारी अभिनेत्री अस्मिता देशमुख सध्या चांगलीच चर्चेत आहे.
-
अस्मिता देशमुखचा जन्म पुण्यातील देहू या ठिकाणी २९ जूनला झाला.
-
पुणे इथल्या हुजूरपागा गर्ल्स हायस्कूल या शाळेत अस्मिताने शिक्षण पूर्ण केलं.
-
अस्मिताने 'एसएनडीटी' विद्यापिठातून सायकोलॉजी ही पदवी घेतली.
-
शालेय जीवनापासूनच अस्मिताला अभिनय आणि गाण्याची आवड आहे.
-
अभिनेत्री असण्यासोबतच ती उत्तम गायिका आहे.
-
अस्मिताने काही शॉर्टफिल्म्स, म्युझिक व्हिडिओ आणि नाटकांमध्येही काम केलं आहे.
-
छोट्या पडद्यावरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात अस्मिताने ती अभिनेता स्वप्नील जोशीची मोठी चाहती असल्याचं सांगितलं.
-
उत्तम अभिनय आणि सौंदर्य यामुळे अस्मिताचे अनेक चाहते आहेत.
-
अस्मिता सोशल मीडियावर सक्रिय असून फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
-
(सर्व फोटो सौजन्य : अस्मिता देशमुख / इन्स्टाग्राम)

“आता मरण आलं तरीही…”; २२ वर्षांपासून मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता, लग्नाबद्दल म्हणाला…