-
मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीने स्त्रियांना त्यांच्या कपड्यांवरून तसेच अंर्तवस्त्रांवरुन ट्रोल करणाऱ्यांना 'बाई, बुब्स आणि ब्रा' अशी एक पोस्ट शेअर करत सुनावले होते.
-
तिच्या पोस्टला अनेकांनी पाठिंबा देत ट्रोलर्सला सुनावले.
-
दरम्यान हॉलिवूड अभिनेत्री गिलियन अँडरसनचा देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
-
या व्हिडीओमध्ये गिलियन‘मी खूप आळशी आहे आणि यापुढे मी ब्रा घालणार नाही. माझे स्तन माझ्या बेंबीपर्यंत पोहोचले तरी चालतील. पण मी ब्रा घालणार नाही’ असे बोलताना दिसत होती
-
त्यानंतर सोशल मीडियावर गिलियन विषयी चर्चा सुरु झाल्या.
-
गिलियन ही एक ब्रिटिश- अमेरिकन अभिनेत्री आहे.
-
तिने आजवर अनेक हॉलिवूड चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे.
-
‘द हाउस ऑफ मिर्थ’, ‘द माइटी’, ‘द लास्ट किंग ऑफ स्कॉटलँड’, ‘द एक्स फाइल्स’ आणि ‘द एक्स फाइल्स: आय वॉण्ट टू बिलिव्ह’ हे तिचे काही गाजलेले चित्रपट.
-
तसेच तिने काही मालिकांमध्येही काम केले आहे.
-
१९९३ साली प्रदर्शित झालेल्या 'द एक्स-फाइल्स' या मालिकेतील डॅना ही तिची भूमिका विशेष गाजली होती.
-
तिला या मालिकेने लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले होते.
-
त्यानंतर तिने 'अमेरिकन गॉड', 'सेक्स एज्युकेशन', 'द क्राऊन' या सीरिजमध्ये काम केले आहे.
-
(All photos: Gillian Anderson Instagram)

अखेर दाखवला होणाऱ्या पतीचा चेहरा! थाटात पार पडला प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा, जोडीदाराचं नाव आहे खूपच खास…