-
छोट्या पडद्यावरील काही मालिका या अत्यंत कमी वेळात लोकप्रिय होतात. त्यातलीच एक मालिका म्हणजे 'देवमाणूस'.
-
अभिनेता किरण गायकवाड याची मुख्य भूमिका असलेली ही मालिका सध्या लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.
-
विशेष म्हणजे या मालिकेतील सरु आजी सध्या चांगल्याच लोकप्रिय होत असून तरुणाईमध्ये त्यांच्या हटके म्हणींची क्रेझ असल्याचं दिसून येत आहे.
-
सरु आजींची ही भूमिका अभिनेत्री रुक्मिणी सुतार या साकारत असून उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर त्या प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवत आहेत.
-
रंग झाला फिका अन् कोणी देईना मुका.. यांसारख्या भन्नाट म्हणींमुळे 'देवमाणूस' या मालिकेतील सरु आजी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतायत.
-
मालिकेत काम करणाऱ्या सरु आजींनी जुन्या म्हणींना पुन्हा वैभव प्राप्त करुन दिलंय.
-
आपलीच मोरी आणि धुवायची चोरी…
-
चव ना धव अन् पोटभर जेव…
-
बारा लुगडी अन् सदा उघडी…
-
घेणं ना देणं गावभर फिरून येणं…
-
पळणाऱ्याची एक वाट आणि शोधणाऱ्याच्या बारा वाटा…
-
अंगात नाय बळ आणि चिमटा काढून पळ…
-
पोटापाण्याचा नाय पत्ता अन् म्हणती माझीच सत्ता…
-
चेहरा भोळा अन् भानगडी सोळा…
-
खातंय बोकडावानी अन् दिसतंय लाकडावानी!
-
अंगात नाही करणी अन् मला म्हणा तरणी…
-
कानात बुगडी अन् गावात फुगडी…
-
आधीच हौस अन् त्यात पडला पाऊस…
-
नवरा जातोय नवरीसाठी अन् वऱ्हाड जातंय जेवणासाठी…
-
कशात काय अन् फाटक्यात पाय…
-
देणं ना घेणं अन् फुकटचं मधी पडणं…
-
तोंडात गोड अन् मनात खोड…
-
देव बी नेईना आणि घरात कोणी चहा बी देईना…
-
आपलं नाय धड अन् शेजाऱ्याची कड…
-
सरु आजीची भूमिका साकारणाऱ्या रुक्मिणी सुतार या ७० वर्षांच्या आहेत. त्यांनी याआधी अनेक मालिकांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनय क्षेत्रात जवळपास गेल्या दहा वर्षांपासून त्या काम करत आहेत. पण 'देवमाणूस' या मालिकेतील सरु आजींच्या भूमिकेमुळे त्या प्रकाशझोतात आल्या आहेत. (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम, युट्यूब)

आज गणेश चतुर्थीला ‘या’ ३ राशींवर गणपती बाप्पाची विशेष कृपा! अचानक धनलाभ तर आयुष्यातील अडचणी अखेर होतील दूर