-
मराठीतील आघाडीचा अभिनेता म्हणून अंकुश चौधरीकडे पाहिले जाते.
-
दमदार अभिनय कौशल्याच्या जोरावर अभिनेता अंकुश चौधरी मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली.
-
एमडी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना अंकुश व दीपाची पहिल्यांदा भेट झाली.
-
महाविद्यालयात असतानाच हे दोघं एकमेकांना डेट करु लागले. जवळपास दहा वर्षे डेट केल्यानंतर अंकुश-दीपाने लग्न केलं.
-
'ऑल द बेस्ट' या गाजलेल्या नाटकात दोघांनी एकत्र काम केलं.
-
२००७ साली अंकुशने दीपाशी लग्न केलं.
-
अंकुश प्रमाणेच दीपा ही एक उत्तम अभिनेत्री आहे.
-
दीपाने अनेक चित्रपट व मालिकांमध्ये काम केलं आहे.
-
या दोघांना प्रिन्स नावाचा मुलगा आहे.
-
लग्नानंतर दीपाने काही काळासाठी चित्रपटसृष्टीपासून ब्रेक घेतला.
-
मुलगा झाल्यानंतर जवळपास तीन वर्षांनी ती चित्रपटांत परतली.
-
२०१७ साली 'अंड्याचा फंडा' या चित्रपटातून दीपाने कमबॅक केलं.
-
सह्याद्री वाहिनीवरील तिची 'दामिनी' ही मालिका खूप गाजली.
-
मराठीसोबतच तिने हिंदी मालिकांमध्येही काम केलं. 'छोटी माँ', 'थोडी खुशी थोडी गम', 'रेत' या हिंदी मालिकांमध्ये दीपाने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
-
सध्या दीपा, स्टार प्लस वाहिनीवरील 'शौर्य और अनोखी की कहानी' या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. (सर्व फोटो सौजन्य : अंकुश चौधरी, दीपा चौधरी / इन्स्टाग्राम)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग