-
मागच्या महिन्यात अभिनेत्री गीता बसरा दुसऱ्यांदा आई झाली.
-
क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि गीता पुन्हा आई-बाबा झाले.
-
हरभजन आणि गीताला यापूर्वी हिनाया नावाची एक मुलगी आहे.
-
हिनायाचा जन्म २०१६मध्ये झाला.
-
हरभजन आणि गीताने मुलाचे नाव जोवान ठेवले आहे.
-
आई-बाबा होणे, कुठल्याही जोडप्यासाठी सर्वाधिक आनंदाची बाब असते. पण गीता आणि हरभजनला हा आनंद सहजासहजी मिळालेला नाही.
-
जोवानच्या जन्माआधी लागोपाठ दोन वर्षात गीताचा दोनवेळा गर्भपात झाला.
-
२०१९ मध्ये पहिल्यांदा त्यानंतर २०२० मध्ये गीताला गर्भपाताचं दु:ख सहन करावं लागलं.
-
दुसऱ्यांदा गीताचा गर्भपात झाल्यानंतर कठीण काळाता पत्नीला सोबत करण्यासाठी हरभजन पंजाबहून लंडनला गेला होता.
-
गर्भपातानंतर महिलांनी अपेक्षा सोडू नये, त्यांनी स्वत:ला सावरलं पाहिजे, असं गीताने एका आघाडीच्या दैनिकाशी बोलताना सांगितलं. "मागची दोन वर्ष मी आघात सहन केले. पण मी कोलमडले नाही. गर्भपातानंतर स्त्रीच्या हार्मोन्समध्ये अनेक चढ-उतार होतात. यावेळी संयम बाळगणे खूप कठीण असते. पण मी या काळात स्वत: खंबीर राहिले व डगमगले नाही" असे गीताने सांगितले.
-
"मी पुन्हा गर्भवती राहिल्यानंतर पूर्णपणे विश्रांती घेतली. मी विटामिनची औषधं घेतली व पहिले तीन महिने संपण्याची वाट पाहिली. त्यानंतर मी मुंबईला आले व योगा सुरु केला. त्याचा मला खूप फायदा झाला. यावेळी माझा आतला आवाज मला सांगत होता, सगळं व्यवस्थित होणार आणि तसचं घडलं" असं गीताने सांगितलं.
-
हरभजन सिंग आणि गीता बसरा यांचे २९ ऑक्टोबर २०१५ रोजी लग्न झाले.
-
कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा हरभजन पहिला भारतीय आहे.
-
भज्जी हा भारताच्या टी-२० विश्वचषक आणि एकदिवसीय विश्वचषक चॅम्पियन संघाचा एक भाग होता.
-
२००७मध्ये टीम इंडियाने टी-२० आणि २०११मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. हरभजनने आपला अंतिम सामना २०१६मध्ये युएई विरुद्ध खेळला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : गीता बसरा, हरभजन सिंग / इन्स्टाग्राम)

“हर्षल पाटीलनंतर पुढचा नंबर माझा”, ‘तो’ मेसेज वाचून जितेंद्र आव्हाड हादरले; मुख्यमंत्र्यांना विनंती करत म्हणाले…