-
बॉलिवूडमध्ये अतिशय सुंदर अभिनेत्रींच्या यादीमध्ये सर्वात टॉपमध्ये असलेले नाव म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन. दमदार अभिनय आणि मनमोहक सौंदर्य या दोन गोष्टींमुळे ऐश्वर्या रायने चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. ऐश्वर्या रायप्रमाणे हुबेहुब दिसणाऱ्या अनेक मुलींचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. त्यांची तुलना ऐश्वर्याच्या लूकसोबत केली जाते.
-
आशिता सिंह – काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ऐश्वर्यासारख्या हुबेहुब दिसणाऱ्या एका मुलीचे फोटो व्हायरल झाले होते. आशिता सिंह असे या मुलीचे नाव होते. आशिताचे अनेक फोटो ऐश्वर्या रायसोबत कोलाज करुन व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य : आशिता सिंह/इन्स्टाग्राम)
-
आशिता हुबेहुब ऐश्वर्यासारखीच दिसते. तिने ऐश्वर्या रायच्या अनेक गाण्यावर आणि डायलॉग्सवर काही रिल्सही तयार केले आहेत. यात ती ऐश्वर्यासारखीच हावभाव करताना दिसत आहे.
-
मानसी नाईक – मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकची देखील तुलना ऐश्वर्या रायसोबत केली जाते.
-
जानेवारी महिन्यात मानसी नाईकने बॉक्स परदीप खरेरासोबत लग्न केले होते. त्यावेळी मानसीने ऐश्वर्या रायच्या जोधा अकबर या चित्रपटाप्रमाणे लूक केला होता.
-
आमना इमरान – फेब्रुवारी महिन्यात ऐश्वर्या राय बच्चनप्रमाणे हुबेहुब दिसणाऱ्या पाकिस्तानमधील एका मुलीचे फोटो व्हायरल झाले होते. आमना इमरान असे या मुलीचे नाव आहे.
-
स्नेहा उल्लाल – अभिनेत्री स्नेहा उल्लाल ही बॉलिवूडमधील दुसरी ऐश्वर्या राय असल्याचे बोललं जातं. स्नेहा ही दिसायला हुबेहुब ऐश्वर्या सारखीच आहे.
-
स्नेहाने काही दिवसांपूर्वी नववधूच्या वेशात एक फोटोशूट केले होते. त्यात ती ऐश्वर्या रायची झेरॉक्स कॉपी असल्याची कमेंट नेटकऱ्यांनी केली होती.
-
महलाघा जबेरी – महलाघा जबेरी हिचा चेहरा ऐश्वर्या रायसोबत विलक्षण साम्य आहे. तिचे सोशल मीडियावर प्रचंड फॉलोअर्स आहेत.
-
महलाघा जबेरी सौंदर्याची तुलना ऐश्वर्याच्या सौंदर्याशी केली जाते. महलाघा बिग ब्रदर अमेरिकन रिअॅलिटी शोमध्ये देखील झळकली होती. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

Chaddi Baniyan Gang: विधिमंडळातच आमदारांनी घातली बनियन, कमरेला गुंडाळला टॉवेल; ‘चड्डी बनियान गँग’च्या दिल्या घोषणा