-
हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीचा आज वाढदिवस.
-
११ ऑगस्ट १९६१ ला मंगळुरू कर्नाटकमध्ये एका तुलु कुटुंबात जन्म झाला.
-
सुनिल शेट्टीचे पूर्ण नाव सुनिल लामा शेट्टी असे आहे. परंतु, हिंदी सिनेसृष्टीने त्याला 'अण्णा' हे टोपण नाव दिले आहे.
-
सुनिल शेट्टीने १९९२ मध्ये करिअरची सुरुवात केली. त्याच्या अदाकारीला तेव्हा प्रेक्षकांची चांगलीच वाहवाह मिळाली होती. काही सिनेमांतली त्याची अदाकारी कायम प्रेक्षकांच्या स्मरणात राहणारी आहे.
-
बॉलिवूडमधील अण्णा म्हणजे सुनील शेट्टीने २८ वर्षांपूर्वी 'बलवान' या चित्रपटातून चित्रपटात पदार्पण केलं होतं. सुनीलने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
'बलवान', 'गोपी-किशन', 'मोहरा', 'हेरा-फेरी' यांसारखे हिट चित्रपट देणारा सुनील ९०च्या दशकात स्टायलिश अभिनेत्यांमध्ये गणला जायचा.
-
किक बॉक्सिंगमध्ये ब्लॅक बेल्ट घेणारा तो पहिला बॉलिवूड अभिनेता आहे.
-
सुनील शेट्टीचं खंडाळामध्ये एक फार्महाऊस आहे.
-
या फार्महाऊससमोर एखादं आलिशान रिसॉर्टही फिके पडेल.
-
सुनील शेट्टीचा हा बंगला आकर्षक असून सर्व लक्झरी सुविधा उपलब्ध आहेत.
-
खंडाळा येथील या फार्महाऊस सुनिल शेट्टी नेहमी आपला मौल्यवान वेळ घालवतो.
-
सुनील शेट्टी आपल्या कुटुंबासोबत आपल्या फार्महाऊस येत असतो.
-
फार्महाऊसवर स्विमिंग पूलसह इतरही अनेक लक्झरी सुवीधा आहेत.
-
सुनील शेट्टीचा हे फार्महाऊस पाहून तुम्हीही प्रेमात पडला.
-
हिंदी सिनेसृष्टीत अभिनयाबरोबरच त्याने एक निर्माता म्हणूनही काम केले आहे.
-
सिनेसृष्टीतील अनेक कलाकार अभिनयासोबतच इतर व्यवसायातही स्वतःला गुंतवून घेतात. अशा कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे अभिनेता सुनील शेट्टी.
-
अभिनय करता करता तो आता हॉटेल व्यवसायातही आहेत.
-
सुनिल 'मिसचीफ डायनिंग बार' आणि 'क्लब एच २०' चा मालक आहे. या दोन्ही रेस्तराँकडे त्याचे जातीने लक्ष असतेच.
-
उडपी पदार्थ ही त्याच्या रेस्टॉरन्टची खासियत आहे.
-
सुनिल शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीने 'हिरो' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले.
-
सुनीलचे वार्षिक उत्पन्न हे १०० कोटींच्या जवळपास जाणारे आहे. तो एक अभिनेता आणि व्यावसायिक आहे.
-
पॉपकॉर्न मोशन पिक्चर्स नावाने त्याचे प्रोडक्शन हाऊसही आहे.
-
या प्रोडक्शन हाऊसमधून त्याने 'रक्त', 'भागम भाग' आणि 'खेल' या सिनेमांची निर्मिती केली.
-
याशिवाय 'आर हाऊस' नावाचे फॅशन ब्युटिकही सुनील सांभाळतो.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुनील शेट्टी / इन्स्टाग्राम आणि STARS Breaking News / YouTube)

हार्ट अटॅक येणार असेल तर बरोबर एक महिना आधीच कळतं; या दोन लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, जगायचं असेल तर जाणून घ्या