-
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते'.
-
या मालिकेतील प्रत्येक भूमिकेने ही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
-
'आई कुठे काय करते' या मालिकेत मधुराणी गोखले प्रभुलकर, मिलिंद गवळी, रुपाली भोसले यांच्या मुख्य भूमिका आहेत.
-
या मालिकेची कथा अरुंधती आणि तिच्या कुटुंबीयांभोवती फिरते.
-
या मालिकेतील प्रत्येक पात्र हे चर्चेत असते.
-
काही दिवसांपूर्वीच अनिरुद्ध आणि अरुंधतीचा घटस्फोट झाला आहे.
-
लग्नाच्या जवळपास २६ वर्षांनंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.
-
अनिरुद्धसोबत घटस्फोट झाल्यानंतर अरुंधतीने देशमुखांच घर देखील सोडलं आहे.
-
या मालिकेत अभिनेता केदार शिर्सेकर अरुंधतीच्या भावाची भूमिका साकारत आहे.
-
अभिनेता केदार शिर्सेकर हा ज्येष्ठ अभिनेते शशिकांत शिर्सेकर यांचा मुलगा आहे.
-
केदारने अनेक मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
-
केदार शिर्सेकरने अगदी कमी वेळातच आपली अशी वेगळी छाप चित्रपटसृष्टीत निर्माण केली आहे.
-
'लोच्या झाला रे', 'दांडेकरांचा सल्ला', 'सही रे सही', 'यदा कदाचित' यांसारखे त्याचे नाटक गाजले आणि त्यातील त्याच्या भूमिकांसाठी त्याचे कौतुक झाले.
-
कलाविश्वाप्रमाणेच अभिनेता केदार शिर्सेकर सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो.
-
(सर्व फोटो सौजन्य : केदार शिर्सेकर / इन्स्टाग्राम)

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक