-
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
-
मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या अभिनेत्री क्रिती सनॉनला 'हिरोपंती' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला.
-
'हिरोपंती' या चित्रपटानंतर तिने 'बरेली की बर्फी', 'स्त्री', 'दिलवाले', 'कलंक', 'लुकाछुपी', 'पानीपत', 'मीमी' यांसारख्या अनेक चित्रपटांतून क्रितीने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला.
-
क्रितीक्रितीच्या मनमोहक सौंदर्याने अनेकांना भुरळ घातली आहे.
-
क्रितीने नुकतंच सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रासाठी फोटोशूट केलं आहे.
-
या फोटोमध्ये क्रितीने भरजरी लाल रंगाचा लेहंगा परिधान केला असल्याचे दिसत आहे.
-
लाल लेहंगा, कपाळावर बिंदी आणि हातात कलिरे असा एखाद्या नववधूला शोभून दिसेल असा क्रितीचा लूक नेटकऱ्याचं लक्ष वेधून घेतोय.
-
क्रितीच्या या फोटोशूटला तिच्या चाहत्यांनीही चांगलीच पसंती दर्शवली आहे.
-
लवकरच क्रिती दिग्दर्शक ओम राऊत यांच्या 'आदिपुरुष' या चित्रपटात दिसणार आहे. ती दाक्षिणात्य सुपस्टार प्रभास आणि सैफ अली खानसोबत या चित्रपटात दिसणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य – क्रिती सेनॉन / इन्स्टाग्राम)

आजचं चंद्रग्रहण ‘या’ ४ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडेल! बक्कळ पैसा हाती येत पिढ्यानुपिढ्या समृद्ध होणार