-
अभिनेत्री विद्या बालन हिने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
विविध भूमिका साकारत तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य मिळवलं आहे.
-
उत्तम अभिनय आणि संवादकौशल्य यांच्या जोरावर विद्याने कलाविश्वात स्वत:च अढळ स्थान निर्माण केलं आहे.
-
मालिकांपासून करिअरची सुरुवात करणारी विद्या आज कलाविश्वातील यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
-
अभिनेत्री विद्या बालन सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.
-
ती कायम तिचे वेगवेगळ्या अंदाजमधले फोटो शेअर करत असते.
-
नुकतंच विद्याने साडीतले काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोत ती कमालीची सुंदर दिसत आहे.
-
विशेष म्हणजे तिच्या या फोटोवर चाहत्यांनी छान, सुंदर, ग्लॅमरस अशा विविध कमेंट्स दिल्या आहेत.
-
विद्या बालनच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
तिने परिधान केलेल्या अनेक साड्यांमध्ये तिचे तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे.
-
‘इश्किया’, ‘द डर्ट्री पिक्चर’, ‘कहानी’, ‘सुलू’, ‘बेगमजान’, 'मिशन मंगल', 'शकुंतलादेवी' यांसारख्या अनेक चित्रपटात तिने उत्तम भूमिका साकारली आहे.
-
२०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटात विद्याचा अभिनय पाहून सर्वजण थक्क झाले.
-
विशेष म्हणजे या चित्रपटानंतर झिरो फिगर या संकल्पनेला छेद देण्यास विद्या यशस्वी ठरली.
-
त्यामुळे आज लोकप्रिय आणि आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये विद्याचा आवर्जून नाव घेतं जातं. (सर्व फोटो सौजन्य – विद्या बालन/ इन्स्टाग्राम)

आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक