-
‘देवमाणूस’ या मालिकेच्या जागी १६ ऑगस्टपासून झी मराठी वाहिनीवर ‘ती परत आलीये’ ही मालिका सुरु झाली आहे.
-
या मालिकेचा प्रोमो पहिल्यांदा समोर आला तेव्हापासूनच ही मालिका चर्चेचा विषय ठरलीय.
-
या मालिकेमध्ये अनेक कलकार असून सध्या ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.
-
अगदी दोन आठवड्यांमध्ये मालिकेचं कथानक आणि पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलंय.
-
सस्पेनस थ्रिलर किंवा अगदी बोली भाषेत भूताच्या मालिका म्हणतात तशा जॉनरमधील ही मालिका मल्टीस्टाटर असून मराठीमधील नवीन चेहऱ्यांना या मालिकेत संधी देण्यात आलीय. पण एवढे कलाकार असताना या मालिकेत काम करणाऱ्यांना किती मानधन दिलं जातं असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असणार. त्याच प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत या गॅलरीमधून…
-
पण एवढे कलाकार असताना या मालिकेत काम करणाऱ्यांना किती मानधन दिलं जातं असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असणार. त्याच प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत या गॅलरीमधून…
-
टिक्क्या > या मालिकेत सतत घाबरणारं आणि डरपोक व्यक्तीरेखा म्हणजे टिक्क्या. ही भूमिका अभिनेता प्रथमेश शिवलकरने साकारलेली आहे.
-
३० वर्षीय प्रथमेशला या मालिकेतील एका भागासाठी नऊ हजार रुपये मानधन मिळत असल्याचे समजते.
-
विक्रांत > या मालिकेत विक्रांत हे पात्र सध्या अनेक ठिकाणी लीड रोल असल्यासारखं वेळोवेळी जाणवतं. ही भूमिका अभिनेता नचिकेत देवस्थळी याने साकारलेली आहे.
-
नचिकेत हा ३२ वर्षाचा असून त्याला मालिकेतील एका भागासाठी १२ हजारांचे मानधन मिळत असल्याचं समजतं.
-
हनुमंत > मालिकेमध्ये सर्वात गोंधळलेली आणि तितकीच रंजक वाटणारी हनुमंत ही भूमिका साकारलीय अभिनेता समीर खांडेकरने.
-
२७ वर्षीय समीरला या मालिकेतील एका भागासाठी ११ हजार रुपये मानधन मिळत असल्याचं सांगण्यात येतं.
-
नीलंबरी > 'ती परत आलीये'मधील नीलंबरीची भूमिकाही चांगलीच चर्चेत आहे. ही भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे अनुष्का जुन्नरकर.
-
अनुष्का सध्या २३ वर्षांची असून तिला या मालिकेतील एका भागासाठी १५ हजार रुपये मानधन मिळत असल्याचे समजते.
-
अभय > 'ती परत आलीये' मालिकेमधील सर्वाधिक गूढ असणारं आणि सध्या कथेच्या केंद्रस्थानी असणारं पात्र म्हणजे, अभय. अभयची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचं नाव आहे अनुपम बेलवलकर.
-
अनुपम हा ३७ वर्षांचा असून एका भागासाठी तो १७ हजार मानधान घेत असल्याचे समजते.
-
अनुजा > 'ती परत आलीये' मालिकेत अनुजा हे पात्र वैष्णवी करमरकरने साकारलेलं आहे. वैष्णवी अवघ्या २४ वर्षांची आहे.
-
वैष्णवीला या मालिकेतील एका भागासाठी १६ हजार रुपये मानधन मिळत असल्याचे सांगण्यात येते.
-
सतेज > 'भेट लागी जीवा' आणि 'जिगरबाज' या मालिकेत काम करणारा अभिनेता श्रेयस राजेही 'ती परत आलीये' मालिकेत सतेज ही भूमिका साकारतोय.
-
२९ वर्षीय श्रेयसला या मालिकेतील एका भागासाठी १८ हजार रुपये मानधन मिळत असल्याचे समजते.
-
रोहिणी > रोहिणी ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे तनवी कुलकर्णी. 'ती परत आलीये' मालिकेतील ही भूमिका अनेकांना प्रचंड आवडलीय.
-
तन्वी ही २८ वर्षांची असून या मालिकेच्या एका भागासाठी ती १९ हजार रुपये मानधन घेत असल्याचे समजते.
-
सायली > या मालिकेमध्ये एक फूल दो माली अशापद्धतीने रंगवण्यात आलेलं पात्र म्हणजे सायली. सायलीची भूमिका अभिनेत्री कुंजिका काळवीट हिने साकारली आहे.
-
'एक निर्णय' या मालिकेमधून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणारी कुंजिका दिसायला सुंदर आहे. कुंजिकाही वय २७ वर्षांची असून या मालिकेच्या प्रत्येक भागासाठी ती २० हजार मानधन घेत असल्याचं समजते. वर्ष आहे आणि ती या मालिकेतील एका भागासाठी २० हजार रुपये आकारते.
-
बाबुराव तांडेल > 'ती परत आलीये'मधील केअर टेकर म्हणजे बाबुराव तांडेल हे पात्र स्वत: भोवती असणारं गूढ कायम टिकवून आहे. बाबूराव हे पात्र साकारलं आहे ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांनी.
-
६२ वर्षीय विजय कदम हे या मालिकेतील सर्वात ज्येष्ठ नट आहेत. ते एका भागासाठी तब्बल २५ हजार रुपये मानधन घेत असल्याचं समजतं. विजय कदम हे या मालिकेतील सर्वाधिक मानधन घेणारे नट आहेत. (सर्व फोटो सोशल नेटवर्किंग आणि झी मराठीवरुन साभार)

शेतकऱ्यांनो सावधान! एकाच वेळी समोर आली ५२ अतिविषारी घोणस जातीची पिल्ले; शेतकऱ्यानं काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल