छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता आणि 'बिग बॉस १३'चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले आहे. वयाच्या ४०व्या वर्षी सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला आहे. -
सिद्धार्थचा जन्म १२ डिसेंबर १९८० साली मुंबईत झाला होता. त्याचे वडील अशोक शुक्ला हे रिझर्व बॅंक ऑफ इंडियामध्ये कामाला होते. तर आई रीता शुक्ला या गृहीनी आहेत.
सिद्धार्थचे कुटुंब हे मुळचे उत्तर प्रदेशातील प्रयागराजचे (इलाहाबाद) आहेत. सिद्धार्थने सेंट झेवियर्स हायस्कूल या शाळेत शालेय शिक्षण पूर्ण केले. शाळेत असताना सिद्धार्थ टेनिस आणि फुटबॉल खेळायचा. त्यानंतर सिद्धार्थने रचना संसद स्कूल ऑफ इंटेरियर डिझायनर्समधून इंटेरिअर डिझायनिंगचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले. -
इंटेरिअर डिझायनिंग केल्यानंतर सिद्धार्थने काही वर्ष इंटेरिएर डिझायनर म्हणून काम केलं.
२००४ मध्ये सिद्धार्थ ग्लॅड्रॅग्स मॅनहंट आणि मेगामोडेल स्पर्धेत उपविजेते होता. तर इला अरुणने गायलेल्या 'रेशम का रुमाल' या म्युझिक व्हिडिओमध्ये तो दिसला होता. २००५ मध्ये, तुर्कीमध्ये आयोजित केलेल्या वर्ल्ड्स बेस्ट मॉडेल या स्पर्धेत सिद्धार्थने भारताचे प्रतिनिधित्व केले आणि आशिया, लॅटिन अमेरिका आणि युरोपमधील ४० स्पर्धकांना हरवून जेतेपद पटकावणारा पहिला भारतीय, तसेच पहिला आशियाई ठरला. -
यानंतर सिद्धार्थ बजाज अवेंजर, आयसीआयसीआय आणि अशा अनेक जाहिरातींमध्ये दिसला होता.
-
२००८ मध्ये सिद्धार्थने छोट्या पडद्यावरील 'बाबुल का आंगन' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
-
२००९ मध्ये सिद्धार्थ वीरवर्धन सिंहच्या भूमिकेत 'जाने पेहचाने से…ये अजनबी' या मालिकेत दिसला होता.
-
या नंतर सिद्धार्थ 'आहट' या हॉरर शोच्या काही एपिसोड्समध्ये दिसला. सिद्धार्थ CID च्या काही एपिसोडमध्ये देखील दिसला होता.
-
मात्र, त्याला खरी लोकप्रियता ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'बालिका वधू'तून मिळाली. या मालिकेत सिद्धार्थने शिवराज शेखर ही भूमिका साकारली होती.
२०१४ मध्ये सिद्धार्थने 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याने अंगद बेदी नावाच्या एका एनआरआय डॉक्टरची भूमिका साकारली होती. -
या चित्रपटातील त्याच्या भूमिकेमुळे आणि अभिनयामुळे त्याला ब्रेकथ्रू सपोर्टिंग परफॉर्मन्स हा पुरस्कार मिळाला होता.
-
२०१४ मध्ये सिद्धार्थला गोल्ड अवॉर्ड मोस्ट फिट अभिनेता हा पुरस्कार मिळाला.
-
२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फियर फॅक्टर : खतरों के खिलाडी ७' चा सिद्धार्थ विजेता होता. त्यानंतर सिद्धर्थने भारती सिंगसोबत 'इंडियाज गॉट टॅलेंट ७'चे सुत्रसंचालन केले होते.
-
२०१९ मध्ये सिद्धार्थने 'बिग बॉस १३' या शो मध्ये स्पर्धक म्हणून एण्ट्री केली होती आणि तो या सीझनचा विजेता होता.
'बिग बॉस १३' मध्ये सिद्धार्थ आणि शेहनाजची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. (Photo Credit : Shehnaaz Gill Instagram) -
'ब्रोकन बट ब्यूटीफुल' या सीरिजच्या तिसऱ्या सीझनमधून सिद्धार्थने ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले.
या सीरिजला आणि सिद्धार्थला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. सिद्धार्थने आज २ सप्टेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. -
मुंबईतील कूपर रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसरा हृदय विकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले आहे.
बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी सिद्धार्थने काही औषधे घेतली होती. त्यानंतर आज सकाळी त्याला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी सिद्धार्थचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले. (All Photo Credit : Sidharth Shukla Instagram)

Manikrao Kokate: रमी खेळतानाच्या व्हिडिओवर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी तर…”