-
गँगस्टर अरुण गवळी यांची मुलगी योगिता व मराठी अभिनेता अक्षय वाघमारे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतात.
-
अक्षय व योगिता यांच्या घरात ७ मे रोजी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं.
-
ही गुड न्यूज अक्षयने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली होती.
-
अक्षय व योगिताने त्यांच्या मुलीचे नाव 'अर्णा' ठेवले आहे.
-
आता पहिल्यांदाच अक्षयने अर्णासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
या फोटोमध्ये अर्णा तिच्या आजी-आजोबांसोबत दिसत आहे.
-
कुटुंबातील सर्वच सदस्य या नवीन पाहुणीच्या आमगमाने खूपच आनंदात आहे.
-
या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
अक्षय वाघमारे याच्याशी योगिता गवळीने ८ मे २०२० रोजी लग्नगाठ बांधली.
-
मुंबईतल्या दगडी चाळीत हा विवाहसोहळा पार पडला होता.
-
अक्षय आणि योगिता हे गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते.
-
अक्षयने बेधडक, दोस्तीगिरी, बस स्टॉप अशा अनेक मराठी चित्रपटात काम केलं आहे. तसंच 'फत्तेशिकस्त' या चित्रपटातही अक्षयनं महत्त्वाची भूमिका साकारली होती.
-
महिलांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेसाठी योगिता काम करते.
-
काही चित्रपटांची निर्मिती देखील योगितानं केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य – योगिता गवळी, अक्षय वाघमारे / इन्स्टाग्राम)

Horoscope Today: अंगारकी संकष्टी चतुर्थीला ‘या’ राशींवर राहील बाप्पाची विशेष कृपा; स्वप्नपूर्तीसह समस्यांपासून मिळेल मुक्ती; वाचा १२ राशींचे राशिभविष्य