-
बॉलिवूडमधील सध्याचे सर्वांचे लाडके कपल म्हणजे सैफ अली खान आणि करीना कपूर.
-
सैफ अली खान आणि करीना कपूर १६ ऑक्टोबर २०१२ रोजी लग्न बंधनात अडकले.
-
सैफने अतीका फारुखीशी संवाद साधताना सांगितले होते की त्याची पहिली पत्नी अमृता सिंह किंवा दुसरी पत्नी करीना कपूरने लग्नानंतर इस्लाम धर्म स्वीकारला नव्हता. तसेच त्यांच्यावर तो स्वीकारण्यासाठी दबाव देखील टाकण्यात आला नव्हता.
-
सैफच्या कुटुंबात कधीही धर्मावरुन जबरदस्ती करण्यात आलेली नाही. त्याची पहिली पत्नी अमृता सिंहवर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आला नव्हता.
-
त्यानंतर करीनाला ज्या गोष्टी आवडत होत्या त्या करीनाने केल्या. करीनाने तिच्या अडनावासोबत खान जोडले असे सैफ म्हणाला.
-
धर्म ही एक अंतर्गत बाब आहे आणि हे प्रत्येक व्यक्तीवर सोडायला हवे. त्या व्यक्तीला काय हवे आहे याचा विचार आपण करायला हवा असे सैफचे म्हणणे होते.
-
पुढे सैफ म्हणाला, जेव्हा अमृता आणि माझा घटस्फोट झाला तेव्हाही मला अमृतावर पूर्ण विश्वास होता की ती धर्माच्या बाबतीत मुलांवर कधीच प्रभाव टाकणार नाही आणि तिने तेच केले.
-
सारा आणि इब्राहिमला अमृताने सर्व धर्मांचा आदर करण्यास शिकवले. जेव्हा ते लहान होते तेव्हा अमृता त्यांना गुरुद्वारामध्ये घेऊन जात असे.
-
लग्नानंतर अमृताला धर्म बदलायचा नव्हता आणि त्यासाठी सैफच्या कुटुंबीयांनी तिच्यावर दाबाव ही टाकला नव्हता.
-
असेच करीना कपूरसोबत देखील झाले. धर्म बदलण्यासाठी करीनावरही दबाव नव्हता.

अखेर दाखवला होणाऱ्या पतीचा चेहरा! थाटात पार पडला प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा, जोडीदाराचं नाव आहे खूपच खास…