-
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात.
-
एकेकाळी ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेत सुनेची भूमिका साकारणाऱ्या स्मृती आता खरोखरच्या आयुष्यात सासू झाल्या आहेत. -
स्मृती इराणी यांची मुलगी शनैल इराणीचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे.
-
याबाबत एक पोस्ट शेअर करत त्यांनी ही आनंदाची बातमी दिली आहे.
-
स्मृती इराणी यांनी नुकतंच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शनैल इराणी आणि अर्जून भल्लाचा एक फोटो शेअर केला आहेत. यात ते दोघेही एकमेकांना अंगठी घालताना दिसत आहे.
-
तुम्हाला माहित नसेल की शनैल ही स्मृती इराणी यांची सावत्र मुलगी आहे. शनैल ही मोना इराणी यांची मुलगी आहे.
-
शनैलचे तिच्या दोन्ही भावंडांसोबत चांगले ट्यूनिंग आहे. तर, स्मृती इराणी यांचेही शेनेलची आई मोनासोबत चांगले संबंध आहेत.
-
शनैलचे नाव शाहरुख खानने ठेवले होते. शाहरुख खान आणि शनैलचे वडील झुबिन इराणी बालपणीचे मित्र आहेत.
-
शनैल वकील आहे. तिने मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून लॉ ची पदवी मिळवली आहे. त्यानंतर तिने वॉशिंग्टन डीसी येथील जॉर्जटाउन युनिव्हर्सिटी लॉ सेंटरमधून एलएलएम पदवी पूर्ण केली.
-
डीएनएच्या रिपोर्टनुसार, शनैलचा होणारा पती अर्जुन भल्ला हा कोणत्याही राजकीय कुटुंबाशी संबंधित नाही आणि तो लंडनमधून एमबीए करत आहे. (सर्व फोटो – सोशल मीडिया)

Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात काय काय घडलं? घटनाक्रम नेमका काय?