-
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा आज वाढदिवस आहे. सलमानचा जन्म २७ डिसेंबर १९६५ रोजी झाला. आपल्या अभिनयाच्या स्टाइलने तसेच पिळदार शरीरयष्टीमुळे त्याने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे.
-
गेल्या काही वर्षात सलमानने रोमान्सपासून ते कॉमेडीपर्यंत, अॅक्शन ते दुहेरी भूमिकेत काम केले आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिस किंग, टागर ऑफ बॉलिवूड, भाईजान, सल्लू अशा अनेक नावाने सलमानला ओळखले जाते.
-
बॉलिवूडचा ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ म्हणून सलमान खानला ओळखले जाते. सलमानने अद्याप लग्न केलेले नाही.
-
सलमान खानच्या लग्नावरुन आतापर्यंत अनेक चर्चा रंगल्या आहे. सलमान खानचे नाव अनेक अभिनेत्रींशी आतापर्यंत जोडण्यात आले आहे. मात्र अद्याप तो अविवाहित आहेत. यामुळे तो अनेकदा वादातही सापडला होता.
-
सलमान खानचे आयुष्यात संगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ अशा कितीतरी मुली आल्या आहे. सलमान अजूनही बॅचलर आहे.
-
अवघ्या १९ व्या वर्षी सलमान खानचे एका मुलीवर प्रेम जडले होते. विशेष म्हणजे ती त्याची पहिली गर्लफ्रेंड होती.
-
या मुलीसाठी सलमान कॉलेजच्या दिवसात लाल रंगाच्या स्पोर्ट्स कारमधून खूप फेऱ्या मारायचा.
-
ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नव्हे तर ती शाहीन जाफरी होती. शाहीन जाफरी ही व्यवसायाने मॉडेल होती.
-
सलमान खान हा त्यावेळी सिनेसृष्टीत कार्यरत नव्हता. तो त्यावेळी मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिकत होता.
-
सलमान आणि शाहीनची ओळख कियारा अडवाणीची आई जेनेव्हिव अडवाणी यांनी करुन दिली होती. त्यानंतर काही काळ ते दोघेही एकमेकांना डेट करत होते.
-
या दोघांच्या कुटुंबातही त्यांच्या नात्याबद्दल माहिती होते. शाहीनला सलमान खानचे कुटुंब प्रचंड आवडत होते.
-
सलमानच्या बायोग्राफी ‘बीइंग सलमान’मध्येही त्याच्या पहिल्या प्रेमाचा उल्लेख करण्यात आहे.
-
संगीता बिजलानीच्या आधी सलमान खान शाहीनच्या प्रेमात वेडा झाला होता. तिला भेटण्यासाठी सलमान तिच्या घरी दूध आणि ब्रेड घेऊन जायचा.
-
त्यानंतर ते दोघेही लग्न करतील असे अनेकांना वाटत होते. मात्र तसे काहीही झाले नाही.
-
याच दरम्यान सलमान हा प्रसिद्ध मॉडेल संगीता बिजलानी हिला भेटला होता. त्या दोघांमधील मैत्री वाढू लागली.
-
त्यानंतर सलमान आणि शाहीनचे नाते तुटले. संगीतासोबत सलमानच्या लग्नाची पत्रिकाही छापण्यात आली होती. पण काही कारणात्सव सलमान आणि संगीता यांचे लग्नही होऊ शकले नाही.

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल