-    बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या राय बच्चन ही नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. ऐश्वर्या ही सध्या तिच्या सुखी संसारात रमली असली तरी तिचा भूतकाळ मात्र कायम आहे. 
-    पण एकेकाळी ऐश्वर्या राय ही अभिनेता विवेक ओबेरॉयच्या प्रेमात वेडी झाली होती. पण त्यानंतर त्या दोघांचाही ब्रेकअप झाला. 
-    एकेकाळी एकमेकांवर जीवापाड प्रेम असणारे ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉय आता मात्र एकमेकांची तोंडही पाहत नाहीत. 
-    ऐश्वर्या रायचे नाव विवेक ओबेरॉयशिवाय सलमान खानसोबत जोडले गेले होते. 
-    ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान आणि ऐश्वर्या यांच्यात जवळीक वाढली होती. त्यानंतर ते दोघेही प्रेमात पडले होते. पण काही काळानंतर त्या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चाही समोर आल्या. 
-    सलमान खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या ही विवेक ओबेरॉयसोबत रिलेशनशिपमध्ये होती. 
-    त्या काळात विवेक हा चित्रपटांपेक्षा जास्त ऐश्वर्या रायसोबतच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत होता. 
-    विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय ‘क्यों हो गया ना’ या चित्रपटादरम्यान प्रेमात पडले होते. 
-    विवेक आणि ऐश्वर्या हे दोघेही अनेकदा विविध कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावायचे. विशेष म्हणजे विवेकचं ऐश्वर्यावर इतकं प्रेम होतं की त्याने तिच्या ३० व्या वाढदिवसानिमित्त ३० भेटवस्तू दिल्या होत्या. या दोघांमध्ये सर्वकाही नीट सुरु होते. 
-    मात्र अचानक एकेदिवशी विवेक ओबेरॉयने पत्रकार परिषद घेत सलमानवर अनेक आरोप केले. त्यावेळी त्याने मला सलमानकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचेही भाष्य केले. 
-    यामुळे तो ऐश्वर्याच्या आणखी जवळ जाईल, असे त्याला वाटत होते. मात्र याचा परिणाम नेमका उलट झाला. त्या दोघांच्या नात्यालाही तडा गेला, असे बोललं जात होते. 
-    यानंतर ऐश्वर्याने या संपूर्ण प्रकरणाची माझा काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण दिले होते. 
-    या कारणांमुळे विवेक आणि ऐश्वर्याचे नातं तुटलं असे बोललं जातं. ऐश्वर्यासोबतचे नाते तुटल्यानंतर त्याच्या हातातून अनेक चित्रपटाच्या ऑफर्सही गेल्या. 
-    दरम्यान यानंतर एकदा एका मुलाखतीत विवेकने याबाबत भाष्य केले होते. 
-    “मला माझ्या काही जवळच्या लोकांनीच हे पाऊल उचलण्यासाठी सांगितले होते”, असे सांगत त्याने अप्रत्यक्षरित्या ऐश्वर्याकडे इशारा केला होता. 
 
  “एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या… 
   
  
  
  
  
   
   
   
   
  