-
सध्या सोशल मीडियावर दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या KGF 2 ची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात अभिनेत्री अर्चना जोइसनं त्याच्या ऑनस्क्रीन आईची भूमिका साकारली आहे.
-
KGF मध्ये रॉकीभाई अर्थात अभिनेता यशच्या ऑनस्क्रीन आईची भूमिका साकारणारी अर्चना खऱ्या आयुष्यात मात्र खूपच सुंदर दिसते.
-
एकिकडे चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असतानाच अर्चना जोइसचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
-
चित्रपटात हृदय हेलावून टाकणारे जबरदस्त सीन देणारी अभिनेत्री अर्चनाचं वय अवघं २७ वर्षं आहे.
-
चित्रपटातील अर्चनाचा लुक पाहिल्यानंतर खऱ्या आयुष्यातील तिचे फोटो पाहिल्यानंतर थक्क व्हायला होतं. एवढी ती सुंदर दिसते.
-
अर्चना जोइसचं इन्स्टाग्राम अकाउंट पाहिल्यानंतर तिच्या सौंदर्यावर कोणीही घायाळ होईल एवढी ती ग्लॅमरस आणि सुंदर आहे.
-
अर्चना जोइस ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध मॉडेल आणि नर्तिका आहे. मात्र तिला खरी ओळख केजीएफ या चित्रपटानंच दिली.
-
अर्चना जोइस एक कथ्थक डान्सर आहे. तिने अनेक स्टेज परफॉर्मन्समध्ये सहभाग घेतला आहे.
-
२७ वर्षीय अर्चना जोइस ही मूळची कर्नाटकची राहणारी आहे. सध्या ती केजीएफ २ मुळे बरीच चर्चेत आहे.
-
अर्चनाबद्दल आणखी एक गोष्ट थक्क करणारी आहे ती म्हणजे अर्चना विवाहित असून श्रेयस उथप्पा असं तिच्या पतीचं नाव आहे.
-
अर्चना सोशल मीडियावर बरीच सक्रीय असून इन्स्टाग्रामवर तिचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. असंख्य चाहते तिच्या एका स्माइलचे दिवाने आहेत.
-
अर्चनानं सोशल मीडियावर बरेच फोटो शेअर केले असून अगदी पाश्चिमात्य ते भारतीय सर्वच प्रकारच्या पोशाखात तिचं सौंदर्य खुलून दिसतं. (फोटो- अर्चना जोइस इन्स्टाग्राम)

‘या’ भयंकर आजारानं शिरीष गवसचा मृत्यू; सुरुवातीलाच दिसतात ६ जीवघेणी लक्षणे, दुर्लक्ष न करता लगेच जाणून घ्या