-
सलमान खान आणि अरबाज खानचा भाऊ सोहेल खान लग्नाच्या २४ वर्षानंतर पत्नी सीमा सचदेवपासून घटस्फोट घेत आहे. अभिनेता सोहेल खानने सीमा सचदेवसोबत धर्माचे बंधन तोडून प्रेमविवाह केला होता. (All Photos: Social Media)
-
अरबाज खानने मलायका अरोरासोबत लग्न केले होते. मात्र १८ वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला.
-
ख्रिश्चन धर्माला मानणारी अभिनेत्री समंथा रुथ हिने अभिनेता नागा चैतन्यसोबत लग्न केले होते. लग्नाच्या चार वर्षांनी २०२१ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.
-
अभिनेत्री आणि लोकसभा खासदार नुसरत जहाँने बिझनेसमन निखिल जैनसोबत लग्न केले होते. मात्र लग्नानंतर दोन वर्षांतच दोघे वेगळे झाले.
-
सैफ अली खानने अमृता सिंगशी लग्न केले होते. २००४ मध्ये दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला आणि आपले मार्ग वेगळे केले.
-
अभिनेत्री संगीता बिजलानीने क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनशी लग्न केले होते आणि त्यानंतर ते दोघेही वेगळे झाले.
-
अभिनेता पंकज कपूरने अभिनेत्री नीलिमा अझीमसोबत लग्न केले. शाहिद कपूर या दोघांचा मुलगा आहे. शाहिदच्या जन्मानंतर काही वर्षांनीच दोघे वेगळे झाले.
-
दिवंगत अभिनेते दारा सिंग यांचा मुलगा आणि अभिनेता विंदू दारा सिंगने अभिनेत्री फराह नाजसोबत लग्न केले. फराह आणि तब्बू या खऱ्या बहिणी आहेत. लग्नाच्या काही वर्षांनी विंदू आणि फराहचा घटस्फोट झाला.

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक