-
खेळ, बॉलिवूड आणि फिटनेस यांचं अगदी जवळचं नातं आहे.
-
बॉलिवूड चित्रपट निर्माते स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटांचे चाहते आहेत, तर अनेक बॉलिवूड कलाकार फिटनेस प्रेमी आहेत. काही कलाकारांना तर वैयक्तिक जीवनात खेळांची खूप आवड आहे. हे कलाकार केवळ फिटनेससाठीच नाही तर त्यांच्या आवडीमुळेही खेळाशी जोडलेले आहेत.
-
आज २९ ऑगस्ट रोजी भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला गेला. या निमित्तानं आम्ही तुम्हाला अशा कलाकारांबद्दल सांगत आहोत जे अभिनयासोबतच खेळातही पुढे आहेत.
-
ऑल स्टार्स फुटबॉल क्लबला ASFC म्हणूनही ओळखलं जातं. या क्लबमध्ये तुमचे आवडते कलाकार फुटबॉल खेळताना दिसतात. कार्तिक आर्यन ASFC क्लबशी संबंधित आहे.
-
कार्तिकचे खेळावरील प्रेम शाळेपासून सुरू झाले. त्याला खेळण्याची इतकी आवड होती की तो आपल्या मित्रांसोबत फुटबॉल खेळण्यासाठी क्लासेस बंक करत असे.
-
अपारशक्ती खुरानाने रुपेरी पडद्यावर अभिनेता म्हणून स्वतःला सिद्द केलंय. पण इंडस्ट्रीत येण्यापूर्वी तो क्रिकेटर होता.
अपारशक्ती हरियाणा अंडर-१९ क्रिकेट संघाचा कर्णधार होता. त्यांने अनेक स्पर्धांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व केले होते. -
तो फक्त क्रिकेटच खेळत नाही तर ऑल स्टार्स फुटबॉल क्लबकडूनही खेळतो. अल्टीमेट खो खो २०२२ सीझन १ होस्ट करण्यासाठीही त्याची निवड करण्यात आली आहे.
-
अभिनेत्री दीपिका पदुकोणचं फिटनेस आणि खेळ यांच्याशी खूप जवळचं नातं आहे. राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटनपटू दीपिकाचे खेळावरील प्रेम अगदी सर्वश्रुत आहे.
-
दीपिका ही दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांची मुलगी आहे. दीपिकासोबत सामने खेळलेली बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूच्या मते, दीपिकाने जर अभिनयाऐवजी करिअर म्हणून बॅडमिंटनची निवड केली असती तर खेळ जगतातलं मोठं नाव असती.
-
अभिनेत्री लिसा हेडनला सर्फिंग हा वॉटर स्पोर्ट्स खूप आवडतो. अलीकडेच ती तिची टोन्ड बॉडी फ्लॉंट करत सर्फिंग करताना दिसली. याशिवाय अनेकवेळा ती वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटताना दिसते.
-
रणबीर कपूरचे फुटबॉल प्रेम सर्वांनाच माहीत आहे. रणबीरने त्याच्या टीम ऑल स्टार्स फुटबॉल क्लबसाठी अनेक सामने खेळले आहेत.
-
रणबीरचे लहानपणापासूनच फुटबॉलवर प्रेम आहे. तो शाळे असताना फुटबॉल टीमचा भाग होता.
-
साकिब सलीम ‘८३’ या चित्रपटात माजी क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथच्या भूमिकेत दिसला होता. एक चांगला अभिनेता असण्यासोबतच साकिबला क्रिकेट खेळायलाही आवडते.
-
अभिनेत्री सैयामी खेर नेहमीच टेनिस ग्रँडस्लॅमला फॉलो करत असते. रॉजर फेडररबरोबरही तिने फोटो शेअर केले होते. पण सैयामीचा खेळाशी असलेला संबंध केवळ टेनिसपुरता मर्यादित नाही. ती शालेय स्तरावर महाराष्ट्रासाठी क्रिकेट खेळली आहे.
-
याशिवाय सैयामीची राष्ट्रीय संघातही निवड झाली होती. पण त्याऐवजी तिने बॅडमिंटन नॅशनल चॅम्पियनशिपची निवड केली होती.
-
तापसी पन्नूने अलीकडेच भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजची भूमिका साकारली होती. तिच्या ‘शाबाश मिठू’ या चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती.
-
तापसीने खेळावरील तिचं प्रेम अनेकदा व्यक्त केलं आहे. शाळेत तापसी खेळात आघाडीवर असायची. तापसीला स्क्वॅश खेळायला खूप आवडतं. ती स्क्वॅश खूप छान खेळते.
-
(सर्व फोटो इंडियन एक्सप्रेसवरून साभार)
Shivajirao Kardile : भाजपा आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं निधन