-
दिल्लीवरून सुपरस्टार बनायचं स्वप्न उराशी बाळगून मुंबईत आलेल्या शाहरुख खान आज त्याचा ५७ वा वाढदिवस साजरा करत आहे.
-
या निमित्ताने शाहरुखच्या जुन्या फोटोमधून आपण त्याचा सुपरस्टार बनण्याचा प्रवास पाहूया.
-
चित्रपटात काम सुरू करण्यापूर्वी शाहरुखने ‘फौजी’, ‘सर्कस’ ‘वागळे की दुनिया’ या टेलिव्हिजनच्या मालिकांमधून काम केलं आणि त्यातूनच त्याला लोकप्रियता मिळाली.
-
२०१६ मध्ये शाहरुखने ‘आयुष्याची २५ वर्षे’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वतःचं आत्मचरित्र लोकांसमोर मांडलं.
-
या कार्यक्रमात शाहरुखने त्याचा सगळा जीवनप्रवास उलगडून सांगितला.
-
शिवाय कोणत्याही फिल्मी बॅकग्राऊंडमधून न येतासुद्धा शाहरुखला चित्रपटसृष्टीतील लोकांना सांभाळून घेतल्याचंही त्याने स्पष्ट केलं.
-
शाहरुख म्हणाला, “अभिनेता हा पाण्यासारखा असतो, त्यामुळे त्याला हवं ते रंग आणि रूप तो घेऊ शकतो. कला ही जास्त महत्त्वाची आहे, कलाकार नाही असं माझं ठाम मत आहे आणि कलाकृती कायम लोकांच्या स्मरणात राहते.
-
शाहरुख हा त्याच्या मृदु आणि प्रेमळ स्वभावासाठी ओळखला जातो.
-
याबरोबरच त्याचा हजरजबाबीपणादेखील त्याच्या चाहत्यांना फार आवडतो.
-
तब्बल तीन दशकं शाहरुख प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.
-
‘झीरो’ चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर शाहरुखने तब्बल ३ वर्षं रुपेरी पडद्यापासून फारकत घेतली होती.
-
शाहरुख अभिनयाबरोबरच निर्मिती आणि व्हीएफएक्सच्या क्षेत्रातही तरबेज आहे.
-
शाहरुखची ‘रेड चिलीज’ ही कंपनी भारतातील सर्वात उत्तम व्हीएफएक्सचं काम करणारी कंपनी म्हणून नावाजली गेली आहे.
-
शाहरुख आता त्याच्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
-
याबरोबरच शाहरुखचे ‘जवान’ आणि ‘डंकी’ हे चित्रपटही पुढच्यावर्षी प्रदर्शित होणार आहेत. त्याचे चाहते यासाठी चांगलेच उत्सुक आहेत. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

Asia Cup 2025: युएईच्या कर्णधाराचा वर्ल्ड रेकॉर्ड, टी-२० इतिहासात ही कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज