-
बिग बॉसचा १६वा सीझन सुरू होऊन एक महिना झाला आहे. पण आतापर्यंत साजिद उघडपणे आपला गेम खेळताना दिसला नाही.
-
साजिद गेल्या एक महिन्यापासून शांतपणे गेम खेळताना आणि भांडण शांत करताना दिसत आहे.
-
पण नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये सलमानने ज्या प्रकारे त्याला फटकारले आहे, त्यावरून या शोमध्ये आणखी ट्विस्ट आणि टर्न येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
-
नुकत्याच पार पडलेल्या ‘बिग बॉस १६’च्या ‘विकेंड का वार’ या एपिसोडमध्ये सलमान खान साजिद खानला आरसा दाखवला आहे. यावेळी सलमानने साजिद खानला,’तू घरात काय करत आहेस?’ असा प्रश्नही विचारला.
-
एवढेच नाही तर सलमान खानने साजिदला स्पष्टपणे सांगितले की जर त्याने बिग बॉसमध्ये टिकून राहण्यासाठी काहीही केले नाही तर घरातून बाहेर पडण्यासाठी तो स्वतः जबाबदार असेल.
-
कलर्स टीव्हीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये साजिद खान सलमानच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणतो, ‘वेळ आल्यावर कळेल की मी इथे काय करत आहे.’
-
साजिदच्या या उत्तरावर सलमान खान भडकला आणि म्हणाला, “इथे वेळ मिळत नाही. तू स्वतः तुला या शोमधून बाहेर काढण्यासाठी कारण देत आहेस हे तुला कळतंय की नाही?”
-
“तू हिपोक्रेट दिसत आहेस. कधी स्टँड घेतोस तर कधी बदलतोस. हा तुझा दुटप्पीपणा आहे.”
-
दरम्यान, सलमानने साजिद खानवर केलेला वार पाहून सोशल मीडिया यूजर्स खूप खुश झाले आहेत.
-
प्रोमो पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, ‘देवाने आमची प्रार्थना ऐकली’. त्याचवेळी आणखी एका यूजरने कमेंट केली की, ‘मी याच क्षणाची वाट पाहत होतो’
-
यानंतर तरी शोमध्ये साजिद खानचे खरे रूप पाहायला मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
-
सर्व फोटो : इंस्टाग्राम

१५ सप्टेंबरपासून ‘या’ ४ राशींची तिजोरी पैशाने भरेल! शुक्राच्या गोचरामुळे वाढेल संपत्ती; लवकरच मिळेल चांगली बातमी…