-
अभिनेत्री अमृता खानविलकरने मराठी सिनेसृष्टीसह हिंदी मनोरंजन क्षेत्रातही आपली वेगळी छाप उमटवली आहे.
-
नुकतीच अमृता कलर्स वाहिनीवरील ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.
-
आज २३ नोव्हेंबरला अमृताचा वाढदिवस आहे. २२ नोव्हेंबरला तिने आपल्या मित्रपरिवारासह आपला खास दिवस साजरा केला आहे.
-
अमृता खानविलकरच्या ३७ व्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी तिचा पती हिमांशू मल्होत्रा आणि तिचे कुटुंबीय उपस्थित होते.
-
अमृताच्या बर्थडे पार्टीत तिच्या इंडस्ट्रीतील मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली. तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे खास फोटो पाहुयात.
-
काल २२ नोव्हेंबरला अमृताने पत्रकारांसमोर केक कापून आपला वाढदिवस साजरा केला.
-
यावेळी तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. या काळ्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
-
या सेलिब्रेशनसाठी अमृतच्या खास मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती.
-
नेहा पेंडसेने यावेळी काळ्या रंगाचा शिमरी वन पीस घातला होता.
-
अभिनेत्री अंकित लोखंडे आपल्या पती विकी जैनसह कार्यक्रमासाठी आली होती.
-
प्रसाद ओक आणि त्याची पत्नी मंजिरी ओकही यावेळी उपस्थित होती.
-
तसेच सोनाली खरे आणि तिचा पती बिजय आनंद या दोघांनीही यावेळी सिल्व्हर रंगाचे कपडे घालून ट्विनिंग केले होते.
-
या सेलिब्रेशनमध्ये अभिनेता ऋत्विक धनजानी यानेही हजेरी लावली.
-
यावेळी त्याने पांढऱ्या रंगाचा जॅकेट परिधान केला होता.
-
शरद केळकरही या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होता.
-
वाढदिवसाच्यावेळी अमृताने दोन केक कापले. (Amruta Khanvilkar Instagram)
-
यावेळी ती खूपच खुश दिसत होती.
-
(सर्व फोटो : Sharik Shaikh)

कॅन्सरचा वाढता धोका उघड! प्रिया मराठेच्या मृत्यूनंतर समोर आले धक्कादायक आकडे, महिला अन् पुरुषांमध्ये झपाट्याने वाढतोय हा कर्करोग