-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आणि बिग बॉस १३चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे गेल्या वर्षी निधन झाले.
-
सिद्धार्थ शुक्लाचे निधन हृदयविकारच्या झटक्याने झाले. त्याच्या निधन संपूर्ण इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला. त्याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.
-
आज सिद्धार्थ शुक्लाचा वाढदिवस आहे. या निमित्ताने अनेक चाहते त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा देत असल्याचे दिसत आहे.
-
सध्या सिद्धार्थ शुक्ला हा सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहे.
-
गेल्यावर्षी २ सप्टेंबर २०२१ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थचे निधन झाले. तो ४० वर्षांचा होता.
-
सिद्धार्थ आणि शहनाझ ही जोडी ‘बिग बॉस १३’च्या घरात असताना चर्चेत होती.
-
सोशल मीडियावर ‘सिदनाज’ म्हणून हे कपल लोकप्रिय होते.
-
सिद्धार्थच्या वाढदिवसानिमित्त सिदनाज यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
बिग बॉसच्या घरातील एका भांडणादरम्यान सिद्धार्थने शहनाझबद्दल स्पष्ट मत मांडलं होतं.
-
“शहनाझ तू माझ्यासाठी सिगारेटसारखी आहेस.”
-
“मला माहिती आहे की तू मला उद्धवस्त करत आहेस. पण तरीही मी त्याचे सेवन करतो,” असे त्याने यावेळी म्हटले होते.
-
यानंतर एका मुलाखतीदरम्यान सिद्धार्थने याबद्दल एक स्पष्टीकरण दिले होते.
-
तो म्हणालेला की, “शहनाझ ही बिग बॉसच्या घरात सतत माझ्याशी भांडायची.”
-
“त्यामुळे पूर्ण वेळ तिला समजवण्यात जायचा.”
-
“शहनाझ रागवल्यामुळे कधीकधी माझाही मूड ऑफ व्हायचा.”
-
“बिग बॉसच्या घरात मी सर्वाधिक काळ तिच्यासोबतच असायचो.”
-
“त्यामुळेच मी असे म्हणालो होतो,” असे स्पष्टीकरण त्याने दिले होते.
-
सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या डोळे पुन्हा पाणावले आहेत.

Ajit Pawar: अजित पवार आणि अंजना कृष्णा प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “खूप वेळा…”