-
आलिया भट्ट बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री मानली जाते. नुकतंच तिने एका मुलीला जन्म दिला असला तरी तिने चित्रपटसृष्टीला रामरामी ठोकलेला नाही. लवकरच ती एका हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे.
-
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित झाला. आलिया भट्टच्या अभिनयाचे यात कौतुक झाले. हा चित्रपट एका वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रीवर आधारित होता.
-
तापसी पन्नू यावर्षी ‘शाबाश मिठू’ मध्ये क्रिकेटर मिताली राजच्या भूमिकेत दिसली होती.
-
बॉलिवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगणने यावर्षी अनेक वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट दिले. ‘रनवे ३४’ या चित्रपटात अजय देवगण कॅप्टन विक्रांत खन्नाच्या भूमिकेत दिसला होता.
-
इश्वाक सिंग या अभिनेत्याने सोनी लिव्हच्या ‘रॉकेट बॉईज’ या वेब सीरिजमध्ये विक्रम साराभाईंच्या भूमिकेत दिसला होता.
-
अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’ हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित झाला. चित्रपटात अमिताभ यांनी विजय बारसे यांची भूमिका साकारली होती, जे खऱ्या आयुष्यात फुटबॉल प्रशिक्षक होते.
-
सध्या ज्या वेबसीरिजवरून वाद सुरु आहे त्या ‘खाकी’ वेबसीरिजमध्ये करण टकरने रिअल कॉप आयपीएस अमित लोढा यांची भूमिका केली आहे.
-
आदिवी शेष यांनी ‘मेजर’ नावाच्या चित्रपटात दिवंगत मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची भूमिका साकारली त्याचं कौतुकदेखील झालं.
-
बॉलिवूडचा मॅडी अर्थात आर माधवनने’ रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’मध्ये प्रसिद्ध शास्त्रज्ञ नंबी नारायण यांची भूमिका साकारली होती.फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग