-
बिग बॉस मराठी या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर.
-
ती नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते.
-
सई ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते.
-
सईने तिच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींची माहिती ही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असते.
-
पण काही दिवसांपूर्वीच सई लोकूरने सोशल मीडियातून ब्रेक घेतला आहे.
-
तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली होती.
-
यावेळी तिने सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचे कारणही सांगितले होते.
-
“मला गेल्या कित्येक दिवसांपासून एक गोष्ट करायची होती.”
-
“अखेर आता मी ते करत आहे.”
-
“मी पुढचे काही दिवस इन्स्टाग्रामपासून ब्रेक घेणार आहे.”
-
“मला हा ब्रेक घेण्याची फार गरज आहे.”
-
“मला माझ्या स्वत:साठी हे पाऊल उचलणे गरजेचे वाटतेय.”
-
“त्यामुळे आता मी तुमची रजा घेते.”
-
“मी पुन्हा सज्ज झाल्यावर नक्कीच परत येईन.”
-
“त्याबरोबर तुमच्यासाठी खूप काही घेऊनही येईन.”
-
“तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. खूप खूप प्रेम.” सई”, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
-
सई लोकूरने स्वत:ला वेळ देण्यासाठी सोशल मीडियापासून ब्रेक घेतल्याचे बोललं जात आहे.
-
दरम्यान सई लोकूरने तीन आठवड्यांपूर्वी म्हणजेच ५ फेब्रुवारीला शेवटची पोस्ट केली होती.
-
त्यानंतर २२ फेब्रुवारीला इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिने ब्रेक घेत असल्याचे जाहीर केले.
-
सईने ‘पारंबी’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘कीस किसको प्यार करु’, ‘जरब’, ‘मी आणि यू’ या चित्रपटात काम केले आहे.
-
त्याबरोबर सई ही ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात