-
अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
सध्या ते ‘सिटी ऑफ ड्रीम्स’या सीरिजमुळे चर्चेत आहेत.
-
सीरिजच्या तिसऱ्या भागाला मिळालेल्या यशानंतर अतुल कुलकर्णी अलीकडेच एका कार्यक्रमात सहभागी झाले होते.
-
अतुल कुलकर्णींनी ‘कर्ली टेल्स’च्या लोकप्रिय ‘तेरे गली मैं’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती.
-
या कार्यक्रमात अतुल कुलकर्णींनी त्यांचे वैयक्तिक आयुष्य, फिटनेस आणि त्यांनी बाहेरगावी खाल्लेले पदार्थ याबाबत सांगितले.
-
कार्यक्रमात त्यांना तुम्ही कधी, कोणता विचित्र पदार्थ खाल्ला आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला.
-
या प्रश्नाला उत्तर देत अभिनेते अतुल कुलकर्णी म्हणाले…
-
“मी बेडकाचे पाय ( फ्रॉग्स लेग) खाल्ले आहेत.”
-
“काही जणांना नाव ऐकून विचित्र वाटले असेल पण, फ्रॉग्स लेग हा पदार्थ बाहेरगावी एकदम कॉमन आहे. “
-
“बेडकाचे पाय मी बुडापेस्टला गेलो होतो तेव्हा खाल्ले होते. मला ती डिश खूप आवडली.”
-
“जेव्हा ऑस्ट्रेलिया गेलो होतो तेव्हा मी कांगारू खाल्ला होता आणि एकदा मगर सुद्धा खाल्ली आहे.”
-
हे सगळे पदार्थ आपल्यासाठी विचित्र आहेत. पण, बाहेरगावी असेच पदार्थ मिळत असल्याचे अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.
-
अतुल कुलकर्णी यांचा खुलासा ऐकून मुलाखतकार सुद्धा थक्क झाल्याचे पाहायला मिळाले.
-
हे सगळे पदार्थ अतुल कुलकर्णींनी परदेशाती लोकल कॅफेमध्ये खाल्ले आहेत.
-
दरम्यान, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’मध्ये अतुल कुलकर्णींनी साकारलेल्या भूमिकेचे सध्या प्रचंड कौतुक करण्यात येत आहे.

आयुष्यभर कॅन्सरचा धोका राहणार नाही! रोजच्या ‘या’ चूका आत्ताच थांबवा नाही तर…, डॉक्टरांनी सांगितलं, कसा वाचवाल जीव