-
२१ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला हृतिक रोशन आणि प्रीती झिंटा यांचा ‘कोई मिल गया’ चित्रपट खूप गाजला होता.
-
या चित्रपटात काही लहान मुलांच्या भूमिका होत्या. यामध्ये अनुज पंडित शर्मा याची खास भूमिका होती.
-
या चित्रपटात अनुज एका छोट्या सरदाराच्या म्हणजेच ‘बिट्टू सरदार’च्या भूमिकेत दिसला होता.
-
या चित्रपटातील त्यांचा ‘आयला’ हा डायलॉग खूप गाजला होता. पण ‘कोई मिल गया’चा ‘चुलबुला बिट्टू’ आता मोठा झाला आहे.
-
आता अनुज त्याच्या डॅशिंग बॉडीने आणि चांगल्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
अनुज सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि त्याचे अनेक फोटो फॅन्ससोबत शेअर करतो.
-
१९९१ मध्ये जन्मलेला अनुज पंडित शर्मा केवळ ११ वर्षांचा होता, तेव्हा त्याने कोई मिल गया या चित्रपटात काम केलं होतं. चित्रपटांव्यतिरिक्त त्याने टीव्हीवरही काम केले आहे.
-
अनुज ‘टोटल सियाप्पा’, ‘डरना मना है’ मध्ये काम केलं आहे. याशिवाय तो डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या बामिनी आणि बॉईज या वेब सीरिजमध्ये दिसला होता.
-
चित्रपट आणि वेब सीरिज व्यतिरिक्त, तो ‘हीरो – भक्ती ही शक्ती है’, ‘हुकुम मेरे आका’, ‘क्राइम पेट्रोल’, ‘परवरिश – सीझन २’, ‘बच्चों की अदालत’ आणि ‘आदत’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्येही दिसला आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा