• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • संजय राऊत
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • संजय राऊत
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. banned in india honored globally the unstoppable journey of santosh spl

जगभरात गाजणारा ‘हा’ चित्रपट भारतीय सेन्सॉर बोर्डाने का थांबवला; काय आहे सिनेमाची गोष्ट?

Santosh Film Ban: भारतातील सेन्सॉर बोर्डाने ‘संतोष’ चित्रपटाला वादग्रस्त ठरवून बंदी घातली असली तरी, आंतरराष्ट्रीय स्तरावर या चित्रपटाचे खूप कौतुक झाले.

Updated: March 29, 2025 18:03 IST
Follow Us
  • Dalit oppression in cinema
    1/12

    ‘संतोष’ ची कथा काय आहे?
    ‘संतोष’ ही उत्तर भारतातील एका खेड्यात राहणाऱ्या एका महिलेची कथा आहे. तिच्या पतीच्या मृत्यूनंतर, तिला पोलिस कॉन्स्टेबलची नोकरी मिळते – तीच नोकरी जी तिचा पती पूर्वी करत होता. ही संधी आर्थिक स्थैर्य आणणारी दिसते, परंतु संतोष हळूहळू एका खोल सामाजिक संघर्षात अडकते. (Still From Film)

  • 2/12

    पोलीस दलात एक महिला म्हणून, तिला केवळ पुरुषप्रधान व्यवस्थेशी झुंजावे लागत नाही तर खोलवर रुजलेल्या जातीयवाद, पितृसत्ताकता आणि भ्रष्टाचाराचाही सामना करावा लागतो. जेव्हा एका दलित मुलीच्या हत्येचा खटला उघडकीस येतो तेव्हा संतोषला कळते की न्याय मिळवणे सोपे नाही. (Still From Film)

  • 3/12

    ही केवळ गुन्ह्याची उकल करणारी एक कथा नाही, तर ज्या व्यवस्थेमुळे हे गुन्हे घडू शकतात त्या व्यवस्थेत खोलवर जाण्याची गोष्ट आहे. या चित्रपटाची सर्वात मोठी ताकद म्हणजे हा चित्रपट संतोषला पारंपरिक नायिका बनवत नाही. (Still From Film)

  • 4/12

    संतोष एक गुंतागुंतीची व्यक्तिरेखा आहे जी कधीकधी अन्यायाविरुद्ध उभी राहते आणि कधीकधी त्याच अन्यायी व्यवस्थेचा भाग बनते. हा चित्रपट आपल्याला या व्यवस्थेत आपण कुठे उभे आहोत याचा विचार करण्यास भाग पाडतो – आपण अन्यायाविरुद्ध लढत आहोत की त्याच्यामागील शांततेचा भाग झालो आहोत? असा प्रश्न उभा करतो. (Still From Film)

  • 5/12

    भारतात बंदी, पण जगात कौतुक
    भारतातील सेन्सॉर बोर्डाने संतोषवर “वादग्रस्त” असल्याचे कारण देत बंदी घातली असली तरी, आंतरराष्ट्रीय स्तरावर या चित्रपटाचे कौतुक होत आहे. या चित्रपटाने कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या Un Certain Regard विभागात स्थान मिळवले आहे. या चित्रपटाची यूकेची अधिकृत ऑस्कर एंट्री म्हणून निवडही झाली. (Still From Film)

  • 6/12

    बाफ्टा पुरस्कारांमध्ये त्याला सर्वोत्कृष्ट पदार्पणाच्या चित्रपटासाठी नामांकन मिळाले. नॅशनल बोर्ड ऑफ रिव्ह्यूने २०२४ च्या टॉप पाच आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये याला स्थान दिले. इतके जागतिक यश असूनही, भारतात त्यावर बंदी घालणे केवळ विरोधाभासीच नाही तर चिंताजनक देखील आहे. (Still From Film)

  • 7/12

    शहाना गोस्वामी यांचा दमदार अभिनय
    या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या शहाना गोस्वामीने संतोषची व्यक्तिरेखा ज्या पद्धतीने साकारली आहे ती चित्रपटाला आणखी प्रभावी बनवते. त्यांनी हे पात्र संयमी अभिनयाने वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. (Still From Film)

  • 8/12

    उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना आशियाई चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. हे पात्र अस्वस्थ करणारे आहे – कारण संतोष सतत बरोबर आणि चूक यांच्यामध्ये गुंतलेली राहते, ज्यामुळे ती अधिक वास्तविक बनते. शहाना यांनी स्वतः मत मांडले आहे की सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या कट्सबद्दल त्या सहमत नाहीत. आता त्यांना चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्याची एकमेव आशा आहे. (Still From Film)

  • 9/12

    संतोषसारखे चित्रपट अत्यंत महत्त्वाचे
    आज जेव्हा भारतीय समाजात मतभेद दाबले जात आहेत, सत्यकथा विकृत केल्या जात आहेत, तेव्हा संतोषसारखे चित्रपट अत्यंत महत्त्वाचे बनतात. हा चित्रपट केवळ गुन्ह्यांची उकल करत नाही, तर कोणत्या प्रकारची व्यवस्था अशा गुन्ह्यांना परवानगी देते हेही दाखवतो. (Still From Film)

  • 10/12

    हा चित्रपट पोलिस व्यवस्था, जातीवाद आणि सत्ता केंद्रे प्रत्यक्षात कसे काम करतात हे दाखवतो. एक सामान्य नागरिक देखील कधीकधी अन्यायाविरुद्ध कसा लढू शकतो आणि कधीकधी त्याचाच भाग बनू शकतो, असा आशय हा चित्रपट सांगतो. ब्रिटीश-भारतीय चित्रपट दिग्दर्शक संध्या सुरी यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. (Still From Film)

  • 11/12

    भारतीय सेन्सॉर बोर्डाने चित्रपट का थांबवला?
    सेन्सॉर बोर्ड ऑफ इंडिया (CBFC) ने संतोषला पास करण्यास नकार दिला. दिलेली कारणे: १. चित्रपट पोलिसांच्या क्रूरतेचे वास्तववादी चित्रण दाखवतो. २. जातीभेद आणि सत्तेचे दमनकारी स्वरूप अधोरेखित करतो. ३. चित्रपट महिला आणि अल्पसंख्याकांविरुद्ध होणारा भेदभाव दाखवतो. (Still From Film)

  • 12/12

    बोर्डाने इतके कट सुचवले की चित्रपटाचा संपूर्ण आत्माच नष्ट झाला असता. यामुळे दिग्दर्शिका संध्या सुरी यांना चित्रपट मागे घ्यावा लागला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हाच सेन्सॉर बोर्ड पोलिस कोठडीतील एन्काउंटर दाखवणारे चित्रपट पास करतो. यावरून आपल्याला कोणत्या प्रकारच्या कथा दाखवल्या जात आहेत आणि कोणत्या कथा दाबल्या जात आहेत हे स्पष्ट होते. (Still From Film) हेही पाहा- रोहित शर्मा ते विराट कोहली; ‘या फलंदाजांची बॅट आयपीएलमध्ये तळपली, ठोकल्या आहेत ५ हजारांहून अधिक धावा…

TOPICS
मनोरंजन
Entertainment
मनोरंजन बातम्या
Entertainment News

Web Title: Banned in india honored globally the unstoppable journey of santosh spl

IndianExpress
  • Eye on strong export advantage, India not keen to dent Turkey trade ties with curbs
  • Internet cut as Meitei leader’s arrest sparks protests in Manipur
  • Fingerprint scanners in districts: Centre’s revised procedure for foreigners ID portal
  • After nearly 8 years, Ayodhya land circle rates hiked up to 200%
  • Pained by Bengaluru stampede, have no connection with Chinnaswamy Stadium, says CM Siddaramaiah
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us