-
अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक मनोज कुमार यांचे ४ एप्रिल २०२५ रोजी मुंबईतील कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. हृदयरोग आणि यकृताच्या सिरोसिसमुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (एक्सप्रेस संग्रहित)
-
मनोज कुमार यांचा जन्म २४ जुलै १९३७ रोजी ब्रिटिश भारतातील अबोटाबाद (आता पाकिस्तानमध्ये) येथे झाला. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब दिल्लीला आले. त्यांनी हिंदू कॉलेजमधून पदवी पूर्ण केली. (एक्सप्रेस संग्रहित)
-
मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकिशन गिरी गोस्वामी होते. ते उत्तम अभिनेते तर होतेच, पण त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठीही ते ओळखले जात होते. यामुळेच लोक त्यांना ‘भारत कुमार’ म्हणू लागले. (चित्रपटातून साभार)
-
दिलीप कुमार यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी आपले नाव ‘मनोज कुमार’ ठेवले. मनोज कुमार यांच्यावर दिलीप कुमार, अशोक कुमार आणि कामिनी कौशल यांचा खूप प्रभाव होता. मनोज कुमार यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ते लहान असताना त्यांनी दिलीप कुमार यांचा ‘शबनम’ चित्रपट पाहिला होता. (चित्रपटातून साभार)
-
त्या चित्रपटातील दिलीप कुमारच्या व्यक्तिरेखेचे नाव ‘मनोज कुमार’ होते. हरी किशन यांना हा चित्रपट आवडलाच नाही तर ते या नावाशी जोडले गेले. यामुळेच पुढे चित्रपटसृष्टीत आल्यानंतर त्यांनी हेच नाव स्वीकारले. (चित्रपटातून साभार)
-
९ ऑक्टोबर १९५६ रोजी, वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी अभिनेत्याचे स्वप्न घेऊन दिल्लीहून ते मुंबईत आले. त्यांना त्यांच्या पहिल्या चित्रपट ‘फॅशन’ (१९५७) मध्ये ८०-९० वर्षांच्या भिकाऱ्याची छोटी भूमिका करण्याची संधी मिळाली. भूमिका छोटी असली तरी त्यांनी ती आवडीने केली. त्यानंतर मागे वळून पाहिले नाही.
-
देशभक्तीच्या भावनेने भरलेल्या चित्रपटांचा प्रवास
मनोज कुमार यांची कारकीर्द अशा काळात भरभराटीला आली जेव्हा सिनेमा मनोरंजनाचे साधन असण्याबरोबरच समाजाला संदेश देण्याचे माध्यमही होते. ‘उपकार’ (1967), ‘पूरब और पश्चिम’ (1970), ‘रोटी कपडा और मकान’ (1974), ‘क्रांती’ (1981) यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी मोठ्या पडद्यावर देशभक्ती आणि सामाजिक प्रश्न प्रभावीपणे मांडले. (चित्रपटातून साभार) -
मनोज कुमार यांना त्यांच्या योगदानासाठी अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, ज्यात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सात वेळा फिल्मफेअर पुरस्कार, १९९२ मध्ये पद्मश्री, २०१५ मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. (चित्रपटातून साभार)

IPL 2025 Playoffs: क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार सामने? जाणून घ्या