-
शाहरूख खान पासून सलान खान आणि अजय देवगन, आमिर खान अशा सुपरस्टार अभिनेत्यांबरोबर काम करणारी मल्याळम अभिनेत्री श्वेता मेनन सध्या अडचणीत सापडली आहे. आमिर खान आणि अजय देवगन यांच्या इश्क चित्रपटात आयटम साँग केल्यानंतर श्वेता मेननला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती.
-
५१ वर्षीय अभिनेत्री श्वेता मेननवर केरळच्या एर्नाकुलम पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
-
श्वेता मेननवर अश्लीलता पसरविल्याचा आरोप ठेवला गेला आहे. अश्लिल चित्रपट आणि जाहिरातींमधून अश्लीलता पसरविल्याबद्दल श्वेताच्या विरोधात एफआयआर दाखल झाला असल्याची माहिती मिळत आहे.
-
मार्टिन मेनाचेरी नावाच्या युवकाने केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला. पॉर्न साईटवर श्वेताच्या चित्रपटातील काही क्लिप्स पाहिल्याचा दावा मार्टिनने केला होता.
-
दरम्यान मार्टिनने म्हटले की, अश्लिल व्हिडीओद्वारे श्वेता मेननने कोट्यवधींचे उत्पन्न मिळवले आहे. मात्र मार्टिनच्या आरोपाची सतत्या पडताळली गेली नाही.
-
दरम्यान या तक्रारीविरोधात श्वेता मेननने केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली. सुनावणीनंतर न्यायालयाने श्वेता मेनन विरोधातील फौजदारी कारवाईला स्थगिती दिली आहे.
-
उच्च न्यायालयाने ज्या प्रकारे तक्रार दाखल झाली, त्यावरही आक्षेप घेतला आहे. सत्यता तपासल्याविनाच गुन्हा दाखल केला गेला, असे ताशेरेही न्यायालयाने ओढले.
-
सदर तक्रार दाखल करण्याच्या टायमिंगवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. १५ ऑगस्ट रोजी असोसिएशन ऑफ मल्याळम मुव्ही आर्टिस्ट (अम्मा) या संघटनेची निवडणूक होत आहे. श्वेता मेनन अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार आहे.
-
निवडणुकीच्या काही दिवस आधीच सदर प्रकारचा गुन्हा दाखल झाल्यामुळे याबाबत वेगळाच संशय व्यक्त करण्यात येत आहे. अम्मा संघटनेला प्रथमच महिला अध्यक्ष मिळेल, अशी चिन्हे दिसत असतानाच हे प्रकरण घडले आहे.
-
मल्याळम अभिनेत्री श्वेता मेननने आजवर बॉलिवूडमध्येही नशीब आजमावले होते. पृथ्वी या सिनेमापासून तिने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. यानंतर सलमान खानच्या बंधन, करिश्मा-गोविंदाच्या शिकारी, शाहरुख खानच्या अशोका या चित्रपटात तिने काम केले होते. याव्यतिरिक्त बॉलिवूडमधील हा मैने भी प्यार किया, वध, अनर्थ, अब के बरस, अनोखा बंधन, धुंध, प्राण जाए पर शान न जाए, मकबूल, हंगामा आणि रन या चित्रपटातही तिने काम केले होते.

अमेरिकेने भारतावर ५० टक्के कर लादले, सोन्याच्या दरावर ‘हा’ परिणाम; सराफा व्यावसायिक म्हणतात…