-
अभिनेत्री जिनिलीया देशमुख तिच्या हटके इन्स्टाग्राम पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. तिने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
मनोरंजन विश्वातील सर्वांची आवडती अन् आदर्श जोडी म्हणून रितेश-जिनिलीयाकडे पाहिलं जातं.
-
या फोटोंमध्ये रितेश-जिनिलीयाने साऊथ इंडियन लूक केल्याचं पाहायला मिळत आहे.
-
जिनिलीयाने गोल्डन रंगाची सुंदर साडी, गळ्यात नेकलेस, हातात बांगड्या असा लूक होता.
-
अभिनेत्रीने या फोटोंना “आनंदाचा दिवस…” असं कॅप्शन दिलं आहे.
-
या फोटोशूटमध्ये जिनिलीया आपल्या लाडक्या नवऱ्याचे Cute फोटो काढत असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
बायको फोटो काढत असताना रितेशने सुद्धा गोड एक्स्प्रेशन्स दिले आहेत.
-
नेटकऱ्यांनी या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “आदर्श जोडी”, “व्हॉट अ लूक”, “दादा-वहिनी किती गोड आलेत फोटो”, “भाऊ आणि आमच्या वहिनीसाहेब” अशा असंख्य प्रतिक्रिया रितेश-जिनिलीयाच्या चाहत्यांनी या फोटोंवर दिल्या आहेत.
-
याशिवाय अमृता खानविलकर, सुयश टिळक, ऋतुजा बागवे या मराठी कलाकारांनी सुद्धा रितेश-जिनिलीयाच्या या Cute फोटोंचं कौतुक केलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य : रितेश-जिनिलीया इन्स्टाग्राम व Wfa With Love )

Modi and Trump : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलण्यास ४ वेळा नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा