एकेकाळी हृदयविकार हा म्हातारपणी होणारा आजार समजला जायचा, मात्र आजकाल २० -३० वर्षांच्या तरुणांमध्येही हृदयविकाराचा त्रास पाहायला मिळतो. सध्या भारतात हृदयविकाराचे प्रमाण झपाटय़ाने वाढत आहे. भारतातील हृदयविकाराचे प्रमाण वाढण्यामागची बरीच कारणे आहेत, मात्र हा विकार होण्यामागे एक कारण सर्वाधिक जबाबदार आहे व ते म्हणजे जीवनशैलीत झालेले बदल. बऱ्याच वेळा आपण लहानसहान शारीरिक दुखापतींकडे दुर्लक्ष करतो. परंतु हेच लहान वाटणारे आजार नंतर बळावतात. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीदेखील अशीच काही दुखणी उद्भवतात. त्यामुळे वेळीच हृदयविकाराची लक्षणे ओळखणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा छातीत दुखत असतं त्यावेळी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. गॅसमुळे दुखत असेल किंवा जड ओझ उचलल्यामुळे दुखत असेल असं म्हणून आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही. परंतु हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी बऱ्याचदा छातीत दुखतं. हृदयाच्या स्नायूंना आवश्यक रक्त, प्राणवायूचा पुरवठा होत नसेल, तर हे लक्षण दिसून येते. त्यामुळे छातीत दुखायला लागल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जा. -
पायांना सूज येणे किंवा पाय दुखणे
-
काहींना उलटीदेखील होते.
बऱ्याच वेळा अचानकपणे दरदरुन घाम फुटू लागतो. हेदेखील हृदयविकाराच्या झटक्याचं लक्षणं आहे. अनेक वेळा हातामध्ये, दंडामध्ये किंवा मानेमध्ये अचानकपणे वेदना जाणवते. -
हृदयविकाराचा झटका येण्याच्या लक्षणांमध्ये हे एक लक्षण आहे. बऱ्याच वेळा अचानकपणे चक्कर येते.
-
अचानकपणे पोटात दुखणे
अनेकदा तिखट किंवा तेलकट पदार्थ खालल्ल्यामुळे छातीत जळजळल्याची समस्या निर्माण होते. परंतु काही वेळा हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी छातीत जळजळ होते.

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक