-
कार कंपन्या सध्या सतत डिस्काउंट ऑफर देत आहेत. आकर्षक ऑफर दिल्याने गाड्यांच्या विक्रीत वाढ होईल अशी कंपन्यांना अपेक्षा आहे, कारण करोना व्हायरस लॉकडाउनमुळे गाड्यांच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. देशातील सर्वात मोठी कार कंपनी Maruti Suzuki जुलै महिन्यासाठी आपल्या प्रीमियम डीलरशिप Nexa द्वारे विक्री होणाऱ्या गाड्यांवर भरघोस डिस्काउंटसह विविध फायदे देत आहे. याशिवाय कंपनीच्या Arena डीलरशिपमधून विक्री होणाऱ्या अनेक कारवर यापूर्वीच डिस्काउंट जाहीर करण्यात आले आहे. जाणून घेऊया Nexa आणि Arena या दोन्ही डीलरशिपमधून होणाऱ्या कोणत्या कारवर किती डिस्काउंट मिळेल.
-
Ignis ऑफर – (Nexa) मारुतीची एंट्री-लेवल प्रीमियम कार इग्निसवर या महिन्यात 40 हजार रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. ही ऑफर कारच्या Zeta व्हेरिअंट वगळता अन्य सर्व व्हेरिअंटसाठी आहे. या ऑफरनुसार ग्राहकांना 20 हजार रुपये कॅश डिस्काउंट, 15 हजार एक्स्चेंज बोनस आणि 5 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट मिळेल. तर, Zeta व्हेरिअंटवर 30 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. यात 10 हजार रुपये कॅश डिस्काउंट, 15 हजार एक्स्चेंज बोनस आणि 5 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे.
-
Ignis किंमत – मारुती इग्निसची बेसिक एक्स-शोरुम किंमत 4.89 लाख रुपये आहे.
-
Baleno ऑफर – (Nexa) कंपनीच्या या पॉप्युलर प्रीमियम हॅचबॅकवर जुलैमध्ये 35 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतं. हे डिस्काउंट बलेनोच्या सिग्मा व्हेरिअंटवर मिळेल. यात 15 हजार रुपये कॅश डिस्काउंट, 15 हजार एक्स्चेंज बोनस आणि 5 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट मिळेल. कारच्या अन्य व्हेरिअंट्सवर 30 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट आहे. यात कॅश डिस्काउंट 15 हजाराऐवजी 10 हजार रुपये मिळेल.
-
Baleno किंमत – बलेनोची बेसिक एक्स-शोरुम किंमत 5.63 लाख रुपये आहे.
-
Ciaz ऑफर – (Nexa) मारुतीच्या या सिडान कारवर जुलैमध्ये 35 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट आहे. हे डिस्काउंट Alpha व्हेरिअंटसोडून अन्य सर्व व्हेरिअंटसाठी असेल. यात 10 हजार रुपये कॅश डिस्काउंट, 20 हजार एक्स्चेंज बोनस आणि 5 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट मिळेल. तर, सियाझच्या Alpha व्हेरिअंटवर 25 हजार रुपयांपर्यंत विविधप्रकारे फायदा मिळू शकतो. या व्हेरिअंटवर कॅश डिस्काउंट उपलब्ध नाही, पण 20 हजार एक्स्चेंज बोनस आणि 5 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट मिळेल.
-
Ciaz किंमत – सियाझची बेसिक एक्स-शोरुम किंमत 8.32 लाख रुपये आहे.
-
XL6 ऑफर – (Nexa) मारुतीच्या या प्रीमियम MPV (मल्टी पर्पज व्हेइकलवर) या महिन्यात 20 हजार रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. ही सवलत एक्स्चेंज बोनसच्या स्वरुपात मिळेल. या कारवर कॅश डिस्काउंट व कॉर्पोरेट डिस्काउंटची ऑफर मिळणार नाही.
-
XL6 किंमत : XL6ची बेसिक एक्स-शोरुम किंमत 9.84 लाख रुपये आहे.
-
Maruti S-Presso ऑफर (Arena) :- मारुतीच्या या माइक्रो-एसयूव्हीवर 48 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट आहे. यात 25 हजार रुपये कॅश डिस्काउंट, 20 हजार रुपये Exchange Bonus आणि 3 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट मिळेल.
-
Maruti S-Presso किंमत :- मारुती एस-प्रेसोची एक्स शोरुम किंमत 3.70 लाख ते 5.13 लाख रुपयांदरम्यान आहे.
-
Maruti Alto ऑफर (Arena) :- मारुतीच्या या छोट्या कारवर 35 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट आहे. यात 18 हजार रुपये कॅश डिस्काउंट, 15 हजार रुपये Exchange Bonus आणि 2 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट मिळेल.
-
Maruti Alto किंमत :- ही ऑफर ऑल्टोच्या पेट्रोल आणि सीएनजी, या दोन्ही व्हर्जनवर मिळेल. या कारची एक्स–शोरुम किंमत 2.94 लाख ते 4.36 लाख रुपयांदरम्यान आहे.
-
Maruti Celerio ऑफर (Arena):- या कारवर 53 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतं. यात 30 हजार रुपये कॅश डिस्काउंट, 20 हजार रुपये Exchange Bonus आणि 3 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट मिळेल.
-
Maruti Celerio किंमत :- ही ऑफर सिलेरिया आणि सिलेरियो एक्स, दोन्हीवर आहे. सिलेरियोची (एक्स-शोरुम) किंमत 4.41 लाख ते 5.68 लाख रुपये, तर सिलेरियो एक्सची किंमत 4.90 लाख ते 5.67 लाख रुपये इतकी आहे.
-
Maruti WagonR ऑफर (Arena) :- कंपनीच्या या लोकप्रिय कारवर 32 हजार रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. या कारवर 10 हजार रुपये कॅश डिस्काउंट, 20 हजार Exchange Bonus आणि 2 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट मिळत आहे.
-
Maruti WagonR किंमत :- वॅगनआरची किंमत 4.45 लाख ते 5.94 लाख रुपये इतकी आहे.
-
Maruti Swift ऑफर (Arena) :- या पॉप्युलर कारवर या महिन्यात 37 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. यात 15 हजार रुपये कॅश डिस्काउंट, 20 हजार रुपये Exchange Bonus आणि 2 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे.
-
Maruti Swift किंमत :- स्विफ्टची एक्स- शोरुम किंमत 5.19 लाख ते 8.02 लाख रुपयांदरम्यान आहे.
-
Maruti Dzire ऑफर (Arena):- नवीन मारुती डिझायर कारवर 37 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंटची ऑफर आहे. यात 10 हजार रुपये कॅश डिस्काउंट, 25 हजार Exchange Bonus आणि 2 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट मिळेल. तर, डिझायरच्या जुन्या मॉडेलवरही (प्री-फेसलिफ्ट) 52 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतं. यात कॅश डिस्काउंट 25 हजार रुपये असून अन्य ऑफर नवीन डिझायरसाठी आहेत त्याच आहेत.
-
Maruti Dzire किंमत :- नवीन डिझायरची किंमत 5.89 लाख ते 8.80 लाख रुपयांदरम्यान आहे.
-
Maruti Eeco ऑफर (Arena):- या कारवर जुलै महिन्यात 32 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. यात 10 हजार रुपये कॅश डिस्काउंट, 20 हजार रुपये Exchange Bonus आणि 2 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे.
-
Maruti Eeco किंमत :- ईकोची एक्स-शोरुम किंमत 3.80 लाख ते 4.95 लाख रुपयांदरम्यान आहे.
-
Maruti Vitara Brezza ऑफर (Arena):- कंपनीच्या या शानदार एसयूव्हीवर 20 हजारापर्यंत डिस्काउंट मिळेल. पण, या कारच्या खरेदीवर ग्राहकांना केवळ Exchange Bonus चीच ऑफर मिळेल, कॅश डिस्काउंट आणि कॉर्पोरेट डिस्काउंट मिळणार नाही.
-
Maruti Vitara Brezza किंमत :- मारुती ब्रिजाची एक्स-शोरुम किंमत 7.34 लाख ते 11.15 लाख रुपयांदरम्यान आहे.
-
मारुतीच्या नेक्सा व Arena च्या या ऑफर कलर, शहर, व्हेरिअंट आणि डीलरशिपनुसार वेगवेगळ्या असू शकतात. कोणत्या कारवर किती डिस्काउंट आहे याबाबतची नेमकी माहिती तुम्हाला जवळच्या डीलरशिपमध्ये संपर्क केल्यास मिळेल.

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल