बाबा रामदेव हे नाव कोणत्याही व्यक्तीला नवीन राहिलेलं नाही. त्यांची योगसाधना आणि पतंजली या मोठ्या ब्रॅण्डमुळे ते आज जगभरात ओळखले जातात. परंतु, संपूर्ण जगात ओळखले जाणारा बाबा रामदेव हे अत्यंत साध्या पद्धतीने जीवन जगत असल्याचं पाहायला मिळतं. ( सौजन्य : जनसत्ता) बाबा रामदेव हे मूळ हरियाणामधील महेंद्रगढ जिल्ह्यातील सैयदपूर येथील असल्याचं सांगण्यात येतं. त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९६५ साली झाला असून रामकृष्ण यादव हे त्यांचं खरं नाव. प्रसिद्धीच्या शिखरावर असलेले बाबा रामदेव हे अत्यंत साधं आणि सामान्य जीवन जगत असून ते निसर्गाच्या सानिध्यात जास्तीत जास्त वेळ व्यतीत करत असल्याचं पाहायला मिळतं. सोशल मीडियावर सक्रीय असणारे बाबा रामदेव अनेकदा त्यांच्या शेतातील फोटो शेअर करत असतात. एकीकडे योग आणि दुसरीकडे पतंजली कंपनी अशा दोन्ही गोष्टींचा भार सांभाळत असलेले बाबा रामदेव शेतीच्या कामात जास्त रमत असल्याचं दिसून येतं. बाबा रामदेव यांचं प्राण्यांवर प्रचंड प्रेम असून एखाद्या लहान मुलाप्रमाणे ते त्यांच्या गाई, वासरु यांचा सांभाळ करताना दिसतात. माती शरीरासाठी फायदेशीर असल्याचं बाबा रामदेव यांचं मत आहे. त्यामुळे बाबा रामदेव यांनी शरीरावर मातीचा लेप लावला आहे. विशेष म्हणजे मातीचा लेप लावून ते योग करताना दिसत आहेत सहज सोप्पं जीवन जगणारे बाबा रामदेव स्वत: शेतीमध्ये मेहनत करतात हे या फोटोवरुन लक्षात येतं. अर्धकुंभदरम्यान, पाण्यात पोहण्याचा आनंद घेणारे बाबा रामदेव कौशिक डेका यांनी बाबा रामदेव यांच्या जीवनावर आधारित ‘द बाबा रामदेव फेनोमेनन : फ्रॉम मोक्ष टू मार्केट’ हे पुस्तक लिहलं आहे. या पुस्तकात रामदेव बाबांविषयी अनेक गोष्टी उलगडल्या आहेत.

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या