-
फोर्ब्सनं वर्ष २०२० च्या टॉप १०० श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पहिल्या स्थानावर रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी हे आहेत. तर या यादीत अन्य काही लोकांनाही स्थान देण्यात आलं आहे. पाहुया कोण आहेत पहिल्या दहा व्यक्ती.
-
फोर्ब्सच्या यादीत मुकेश अंबानी यांना पहिलं स्थान देण्यात आलं आहे. ६ हजार ५०० कोटी रूपयांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे ते अध्यक्ष आहेत.
-
पोर्ट्स टायकून म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गौतम अदानी यांना या यादीत दुसरं स्थान देण्यात आलं आहे. ते अदानी समुहाचे अध्यक्ष असून त्यांच्याकडे १८५० कोटी रूपयांची संपत्ती आहे.
-
या यादीत शिव नाडार हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. देशातील तिसरी मोठी सॉफ्टवेअर कंपनी एचसीएलचे ते प्रमुख आहेत. त्यांच्याकडे १ हजार ४९५ कोटी रूपयांची संपत्ती आहे.
-
फोर्ब्सच्या यादीत राधाकिशन दमानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना १ हजार १३० कोटी रूपयांच्या संपत्तीसह चौथं स्थान देण्यात आलं आहे. एवेन्यू सूपरमार्केटच्या आयपीओनंतर ते रिटेल किंग झाले.
-
९४० कोटी रूपयांच्या संपत्तीसह हिंदुजा ब्रदर्सना या यादीत पाचवं स्थान देण्यात आलं आहे. श्रीचंद हिंदुजा, गोपीचंद हिंदुजा, प्रकाश हिंदुजा आणि अशोक हिंदुजा या समुहाचे प्रमुख आहेत.
-
सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक सायरस पूनावाला यांना ८४३ कोटी रूपयांच्या संपत्तीसह फोर्ब्सच्या यादीत सहावं स्थान देण्यात आलं आहे.
-
मुंबई स्थित इंजिनिअरिंग आणि बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील कंपनी शापूरजी पालोनजी समूहाचे प्रमुख पालोनजी मित्री यांना या यादीत सातवं स्थान देण्यात आलं आहे. त्यांच्याकडे ८३६ कोटी रूपयांची संपत्ती आहे.
-
कोटक बँकेचे प्रमुख उदय कोटक यांना ८२८ कोटी रूपयांच्या संपत्तीसह यादीत आठवं स्थान देण्यात आलं आहे.
-
गोदरेज कुटुंबीय ८०६ कोटी रूपयांच्या संपत्तीसह फोर्ब्सच्या यादीत नवव्या स्थानावर आहेत. आदि गोदरेज हे गोदरेज समुहाचे अध्यक्ष आहेत.
-
आर्सेलर मित्तलचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी मित्तल ७५५ कोटी रूपयांच्या संपत्तीसह या यादीत दहाव्या स्थानावर आहेत.

११ वर्षांचा संसार, कधीच नात्यात वाद नाही; जॉन अब्राहम गुपित सांगत म्हणाला, “मी पहाटे ४ वाजता उठतो अन्…”