-
भारतात सध्या सणासुदीचा काळ सुरू आहे. अशा परिस्थितीत अनेक जण शॉपिंगचाही आनंद घेत असताता. जर तुम्ही घरात एखादा नवा टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला १० हजार रुपयांच्या आत येणारे काही मॉडेल्स सांगणार आहोत. जेणेकरून तुम्हाला टीव्हींची निवड करणंही सोपं होईल.
-
1. Thomson R9 60cm (24 inch) HD Ready LED TV फ्लिपकार्टवर या टीव्हीची किंमत ६ हजार ९९९ रूपये इतकी आहे. यामध्ये १३६६*७६८ पिक्सेल असलेलं एचडी रेडी पॅनल देण्यात आलं आहे. याचं साऊंड आऊटपूट २० वॅट आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर यासोबत काही ऑफर्सही देण्यात येत आहेत.
-
2. Panasonic 60 cm (24 inch) HD Ready LED TV पेटीएम मॉलवर या टीव्हीची किंमत ८ हजार ९६९ रूपये इतकी आहे. यामध्ये १३६६*७६८ पिक्सेल रिझॉल्युशन असलेलं एचडी पॅनल देण्यात आलं आहे. याचं साऊंड आऊटपूट ६ वॅट इतकं आहे.
-
3. Shinco 80 cm (32 Inches) HD Ready LED TV अॅमेझॉनवर या टीव्हीची किंमत ८ हजार ९९९ रूपये इतकी आहे. यामध्ये १३६६*७६८ पिक्सेल असलेलं एचडी रेडी पॅनल देण्यात आलं आहे. याचं साऊंड आऊटपूट २० वॅटचं असून यासोबत १ वर्षाची वॉरंटीही देण्यात येत आहे.
-
4. Koryo 80 cm (32 Inches) HD Ready LED TV अॅमेझॉनवर या टीव्हीची किंमत ९ हजार ९९९ रूपये इतकी आहे. . यामध्ये १३६६*७६८ पिक्सेल असलेलं एचडी रेडी पॅनल देण्यात आलं असून याचं साऊंड आऊटपूट ६ वॅट आहे. या टीव्हीसोबतही १ वर्षांची वॉरंटी देण्यात येत आहे.
-
5. Blaupunkt GenZ Smart 80cm (32 inch) HD Ready LED Smart TV दहा हजार रूपयांच्या आत येणारा हा एक स्मार्ट टीव्ही आहे. सध्या फ्लिपकार्टवर या टीव्हीची किंमत ९ हजार ९९९ रूपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीओ, डिज्नी हॉटस्टार, युट्यूबचा सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये १३६६*७६८ पिक्सेलचं एचडी रेडी पॅनल देण्यात आलं असून याचं साऊंड आऊटपूट ३० वॅटचं आहे.

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली