-
भारतातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीची कार खरेदी करण्यासाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कंपनीने आपल्या वाहनांच्या किंमतीत अखेर वाढ केली आहे. मारुती सुझुकी इंडियाने गेल्या महिन्यातच वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली होती. कालपासून (१८ जानेवारी) नवीन किंमती लागू झाल्या आहेत. कच्चा माल महागल्याने कंपनीने किंमतीत वाढ केली आहे. मारुती सुझुकीने आपल्या निवडक वाहनांच्या किंमतीत ३४ हजार रुपयांपर्यंत(एक्स-शोरुम) वाढ केली आहे. जाणून घेऊया कोणत्या कारच्या किंमतीत किती वाढ झालीये.
-
Maruti S-Presso : 7 हजार रुपयांपर्यंत किंमतीत वाढ (एक्स-शोरुम)
-
Maruti Alto 800 : 14 हजार 000 रुपयांपर्यंत किंमतीत वाढ (एक्स-शोरुम)
-
Maruti Celerio : 19 हजार 400 रुपयांपर्यंत किंमतीत वाढ (एक्स-शोरुम)
-
Maruti Wagon-R : 23 हजार 200 रुपयांपर्यंत किंमतीत वाढ (एक्स-शोरुम)
-
Maruti Ertiga : 34 हजार रुपयांपर्यंत किंमतीत वाढ (एक्स-शोरुम)
-
Maruti Tour S : 5 हजार 61 रुपयांपर्यंत किंमतीत वाढ (एक्स-शोरुम)
-
Maruti Eeco : 24 हजार 200 रुपयांपर्यंत किंमतीत वाढ (एक्स-शोरुम)
-
Maruti Super Carry : 10 हजार रुपयांपर्यंत किंमतीत वाढ (एक्स-शोरुम)
-
Maruti Dzire : 12 हजार 500 रुपयांपर्यंत किंमतीत वाढ (एक्स-शोरुम)
-
Maruti Swift : 30 हजार रुपयांपर्यंत किंमतीत वाढ (एक्स-शोरुम)
-
Maruti Vitara Brezza : 10 हजार रुपयांपर्यंत किंमतीत वाढ (एक्स-शोरुम)

‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक