-
महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीने आपली बहुप्रतिक्षित महिंद्रा बोलेरो निओ ही गाडी भारतीय बाराजपेठेमध्ये मंगळवारी (१३ जुलै २०२१ रोजी) लॉन्च केली. मागील बऱ्याच काळापासून या गाडीची चर्चा होती.
-
महिंद्राच्या सर्वात लोकप्रिय गाड्यांपैकी एक असणाऱ्या बोलेरोचेच हे मॉर्डन व्हर्जन आहे. या गाडीचे फिचर्स काय आहेत जाणून घेऊयात…
-
गाडीचा लूक एकदम भन्नाट आहे. जुन्या बोलेरोमध्ये बराच बदल करुन तिला आखीन स्पोर्टी लूक देण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. एसयूव्ही प्रकारातील ही गाडी सध्या कमी किंमतीमध्ये बाजारात उतरवण्यात आली आहे. इन्ट्रोडक्टरी किंमती या कमी असल्या तरी भविष्यात गाडीच्या किंमतींमध्ये वाढ केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण गाडीची किंमती किती आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आधी आपण गाडीचे फिचर्स काय आहेत त्यावर नजर टाकूयात.
-
महिंद्रा बोलेरो निओचे चार व्हर्जन कंपनीने लॉन्च केले आहेत. यात एन फोर, एन एट, एन टेन आणि एन टेन ओ व्हर्जनचा समावेश आहे. ही एक रियर व्हील ड्राइव्ह एसयूव्ही असल्याने या प्रकारच्या गाड्यांमध्ये थोडी हटके आहे. या गाडीला अत्यंत आकर्षक असा लूक देण्यात आला आहे.
-
हेडलाइट्सवर विशेष काम करण्यात आलं असून आता वरच्या भागामध्ये एलईडी डीआरएल देण्यात आल्याने गाडीचा समोरचा भाग फारच आकर्षक दिसतोय. गाडीमध्ये नवीन फॉग लॅम्प, री-वर्ड फ्रण्ट बम्परही देण्यात आला आहे. गाडीला सिक्स-स्लॅट क्रोम ग्रिड डिझाइनसहीत अपडेट करण्यात आलं आहे.
-
नवीन बोलेरो निओ ही जुन्या गाडीसारखी वाटणार नाही याची काळजी घेतली असली तरी गाडीची मूळ रचना ही जुन्या क्लासिक बोलेरोसारखीच आहे. गाडीला क्लॅम-शेल बोनेट, स्कायर ऑफ, फ्लेयर व्हील आर्च आणि एक जाड प्लास्टिक क्लॅडिंग देण्यात आलं आहे.
-
गाडीला नवीन ड्यूएल फाइव्ह स्पोक अलॉय व्हील्स देण्यात आले असून त्यांना सिल्वर फिनिशिंग आहे. या फिनिशिंगमुळे गाडीची साइड प्रोफाइल फारच आकर्षक दिसते. गाडीच्या मागील भागावर बोलेरो नियोचं ठसठशीत ब्रॅण्डींग आणि एक्स टाइप स्पेअर व्हील देण्यात आलं आहे.
-
महिंद्रा बोलेरोची आठवण येणार नाही याची काळजी कंपनीने एक्सटीरियर डिझायनिंगमध्ये घेतली असली तरी इंटीरीयरमध्ये तेवढा बदल करण्यात आलेले नाही. मात्र काही खास फिचर्स कंपनीने नक्कीच दिले आहेत, ज्यामुळे ही गाडी क्लासिक बोलेरोपेक्षा सरस ठरते.
-
गाडीमध्ये नवीन इन्स्टूमेंट क्लस्टर आणि मल्टी इन्फॉर्मेशनल डिसप्ले स्क्रीन देण्यात आलेली आहे.
-
सुरक्षेच्या हिशोबाने सांगायचं झाल्यास बोलेरो निओमध्ये अॅण्टी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन, ड्युएल फ्रण्ट एअरबॅग्स, रिव्हर्स पार्किंग सेन्सर देण्यात आले आहेत.
-
इंटीरीयरमधील अन्य अपडेटमध्ये टेकश्चर इफेक्टबरोबरच नवीन बेज फॅब्रिक अपहोल्स्ट्री, एनवीन टिल्ट अॅडजेस्टेबल पॉवर स्टेअरिंग व्हील आणि दुसऱ्या रांगेतील आसनांना आर्म रेस्टची सुविधा देण्यात आलीय.
-
नवीन बोलेरो निओमध्ये कंपनीने १.५ लीटरच्या क्षमतेचं थ्री-सिलेंडर असणाऱ्या डिझेल इंजिनचा प्रयोग केलाय. हा इंजिन १०० हॉर्स पॉवरच्या क्षमतेचं असून २६०० एनएम टॉर्क निर्माण करतं.
-
बोलेरो निओचं इंजिन ५ स्पीड मॅन्युअल गेअरबॉक्ससोबत आहे. तसेच कंपनीने इंधन बचत करण्यासाठी स्टार्ट आणि स्टॉप तंत्रज्ञानही या गाडीमध्ये दिलं आहे. असं तंत्रज्ञान टीयूव्ही ३०० मध्ये यापूर्वी वापरण्यात आलं आहे. यामुळे एसयुव्ही गाड्यांचं मायलेज वाढतं. यामध्ये इको ड्रायव्हिंग मोडही देण्यात आलाय.
-
इतर स्टॅण्डर्ड फिचर्ससोबतच या एसयूव्हीमध्ये ब्लू टूथसोबतच सात इंचाचा टचस्क्रीन इन्फोर्टेनमेंट सिस्टीम, स्टेअरिंग माउंटेड ऑडिओ कंट्रोल, क्रूज कंट्रोल, इको मोडसोबतच एअर कंडीशनिंग, फ्रंट आर्म रेस्ट, व्हाइट अॅडजेस्टेबल ड्राइव्हर सीट आणि इलेक्ट्रॉनिक अॅडजेस्टेबल आउट साइड रेअर व्ह्यू मिररसारख्या विशेष सुविधा देण्यात आला आहेत.
-
आता येऊयात किंमतीकडे महिंद्रा बुलेरो निओच्या एन फोर व्हर्जनची किंम ८ लाख ४८ हजार रुपये इतकी आहे. तर एन एट व्हर्जन ९ लाख ४७ हजार ९९९ रुपयांना आहे. त्याचप्रमाणे एन टेन व्हर्जन हे ९ लाख ९९ हजार ९०० रुपयांना असून अजून एन टेन ओ व्हर्जनच्या किंमतीची घोषणा करण्यात आलेली आहे. (सर्व किंमती मुंबईमधील शोरुममधील आहेत.)

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या