-
उन्हाळा, हिवाळा किंवा पावसाळा प्रत्येक हंगामात आपल्या त्वचेवर विविध प्रकारचे परिणाम होतात. यासोबतच धूळ, माती, प्रदूषण याचेही त्वचेवर वाईट परिणाम होता.
-
यामुळे चेहऱ्यावर फोड्या येणं, चट्टे उठणे, मुरुम येणे, डाग पडणे यासारख्या समस्या जाणवतात. या समस्यांपासून सुटका व्हावी यासाठी अनेकजण ब्यूटी ट्रीटमेंट घेतात. तर काही जण तासनतास ब्यूटी पार्लरमध्ये बसून असतात.
-
तसेच काही जण घरगुती उपाय करुन या समस्यांपासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न करतात.
-
पण आपण दैनंदिन जीवनात अशा काही चुका करतो, ज्यामुळे या तुमच्या चेहऱ्यावरील मुरमे कमी होण्याऐवजी वाढू शकतात.
-
बऱ्याच काळासाठी त्याच सौंदर्यप्रसाधनाचा वापर केल्याने चेहरा निस्तेज दिसतो. वय वाढल्यानंतर त्वचेचा पोत बदलतो. त्यामुळे त्या त्वचेला साजेसे उत्पादन वापरावे.
-
चेहरा कधीही साबणाने धुवू नये. साबणामुळे चेहरा धुतल्याने त्वचा कोरडी होते.
-
वारंवार चेहऱ्याला हात लावू नका.
-
तसेच चेहऱ्यावर आलेल्या फोड्या फोडू नये. त्यामुळे त्या पुन्हा येऊ शकतात.
-
जे व्यक्ती कमी पाणी पितात, त्यांच्या चेहरा निर्जीव आणि कोरडा दिसतो. प्रत्येकाने दिवसाला कमीत कमी 3 ते 4 लीटर पाणी प्यावे.
-
तुमच्या फोनची स्क्रीन ही बॅक्टेरियाचे घर असते. तुम्ही वारंवार मोबाईल स्पर्श केल्यास त्याची घाण ही तुमच्या चेहऱ्याला लागू शकते.

IND vs PAK Live Score , Asia Cup 2025 Final: टॉप ऑर्डर कोसळला! पण संजू – तिलकने मिळून टीम इंडियाचा डाव सावरला