-
काळे, घनदाट, लांबसडक केस असावेत, अशी प्रत्येक महिलाची इच्छा असते. आपले केस कधीही सफेद होऊ नये असे प्रत्येकाला वाटते. काळे केस हे सौंदर्यात भर घालतात. त्यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढतो.
-
बाजारात केस काळे करण्यासाठी अनेक उत्पादन उपलब्ध आहेत. मात्र त्यात हानिकारक रसायने असतात. ज्यामुळे केसांना नुकसान पोहोचू शकते.
-
जेव्हा शरीरातील पेशी मेलेनिन नावाच्या रंगद्रव्याचे उत्पादन कमी होते. तेव्हा लोकांना पांढऱ्या केसांची समस्या उद्भवते.
-
तसेच धूळ-प्रदूषण आणि अस्वस्थ आहारामुळे केस पांढरे होण्याचीही समस्या आहे. यातून सुटका मिळवण्यासाठी लोक अनेक आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करतात.
-
आवळा – छोटासा दिसणारा आवळा शरीरासाठी आणि केसांसाठी खूप गुणकारी आहे. आवळा खाल्ल्याने किंवा केसांना लावल्याने केस काळे होतात. विशेष म्हणजे तुम्ही दररोज आवळ्याचा वापर केला तर पांढऱ्या केसांचा लवकर नाहीसे होतात.
-
जर आवळा मेंहदीमध्ये मिसळून केसांना कंडिशनिंग करा. आवळ्याचे बारीक तुकडे गरम खोबरेल तेलात मिक्स करुन केसांना लावा. त्यामुळेही केसांची गुणवत्ता सुधारते.
-
काळी मिरची पांढऱ्या केसांना काळे करण्यास मदत करतात. केसांना शॅम्पू लावल्यावर काळ्या मिरचीचे दाणे पाण्यात उकळवून हे पाणी केस धुवायला वापरा, असं नियमित केल्याने तुम्हाला फरक दिसेल.
-
ब्लॅक टी आणि कॉफी हे सर्वांच्या आवडीचे आहे. जर तुम्हाला पांढऱ्या केसांची समस्या आहे तर याचे नियमित सेवन करा. ब्लॅक टीच्या अर्काने केस धुतल्याने पांढरे होणारे केस काळे होतात.
-
कोरफड ही केसांच्या आणि त्वचेच्या सर्व समस्यांवर रामबाण उपाय आहे. कोरफड केसांना मजबूत बनवते. कोरफडीमुळे पांढरे केस काळे होण्यास मदत होते.
-
कोरफड जेलमध्ये लिंबूचा रस टाकून पेस्ट बनवून केसांना आणि मुळांना लावा. हे नियमित लावल्याने पांढरे केस काळे होतील.

Asia Cup Trophy: मोठी बातमी! भारतीय संघाचा आशिया चषकाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार; मोहसीन नक्वींना बगल