-
सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे मुंबईच्या पहिल्या रेस्टॉरंट-ऑन-व्हीलचे उद्घाटन झाले. हे रेस्टॉरंट वापरात नसलेल्या रेल्वे कोचचा वापरून बनवण्यात आले आहे. (फोटो सौजन्य: गणेश शिरसेकर) -
सीएसएमटी हेरिटेज गलीमध्ये हे लोकोमोटिव्ह ठेवण्यात आले आहे. यासोबत नॅरोगेज लोकोमोटिव्ह्ज, जुन्या प्रिंटिंग प्रेसचे भाग इत्यादींसह रेल्वे कलाकृती आहेत. (फोटो सौजन्य : रेल्वे पीआर)
-
यामध्ये उत्तर, दक्षिण, महाद्वीपीय आणि इतर पाककृती उपलब्ध असतील. हे रेस्टॉरंट प्रवाशांसाठी आणि सामान्य लोकांसाठी देखील खुले असेल. सर्व कोविड -१९ मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून हे रेस्टॉरंट सुरु आहे. (फोटो सौजन्य : रेल्वे पीआर)
-
मुंबई विभागातील लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, नेरळ, लोणावळा आणि इगतपुरी येथे अशीच उपाहारगृहे उघडण्याचा रेल्वेचा विचार आहे. (फोटो सौजन्य : रेल्वे पीआर)
-
या रेस्टॉरंटजवळ पुरेशी पार्किंगची जागा आणि उपनगराशी सुलभ कनेक्टिव्हिटी असेल. (फोटो सौजन्य : गणेश शिरसेकर)
-
मुंबईच्या लँडमार्कच्या थीमनुसार रेस्टॉरंटची रचना करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य : गणेश शिरसेकर)
-
रेस्टॉरंटमध्ये किचनमधील सर्व उपकरणे तसेच जेवणासाठी फर्निचर रेल्वेच्या डब्यात बसवण्यात आले आहे. (फोटो सौजन्य : गणेश शिरसेकर)
-
यातील फर्निचर हे तिथेच तयार केले गेले आहे. (फोटो सौजन्य : गणेश शिरसेकर
-
कोचच्या रंगकामाचे फिनिशिंग टच पूर्ण झाले आहेत. (फोटो सौजन्य : गणेश शिरसेकर)
-
कोचचा निळा रंग चमकदार पिवळ्या आणि काळ्या आणि तपकिरी रंग देऊन बदलला आहे. (फोटो सौजन्य : गणेश शिरसेकर)