-
भारतात आज ९० टक्क्याहून अधिक लोकांकडे आधारकार्ड आहे. आधारकार्ड योजना आल्यानंतर पहिलं आधारकार्ड कुणाचं काढलं असेल? हा प्रश्न तुम्हाला कधीतरी पडला असेलच.
-
आधार कार्डचे कामकाज यूपीए सरकारच्या काळात लागू करण्यात आले होते. आधार प्रकल्पाचे नेतृत्व इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी करत होते. आधार कार्डच्या आगमनाने भारतात अनेक बदल घडून आले आहेत. आधार हा व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा आहे.
-
आधार कार्डमुळे देशात पारदर्शकता दिसून आली असून अनेक सरकारी कामांमध्येही सुधारणा झाली आहे. विविध सरकारी योजना, बँकिंगशी संबंधित काम, नोकऱ्या इत्यादींमध्ये आपल्याला आधार कार्डाची विशेष गरज आहे.
-
जानेवारी २००९ मध्ये, भारत सरकारने युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना केली.
-
या प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर सप्टेंबर २०१० पासून आधार कार्ड बनविण्याचे काम सुरू झाले. त्यानंतर भारतातील लोकांचे आधार कार्ड मोठ्या प्रमाणावर बनवून त्यांना वितरित केले जाऊ लागले.
-
भारतातील पहिल्या आधार कार्डबद्दल बोललो, तर देशातील पहिले आधार कार्ड २९ सप्टेंबर २०१० रोजी रंजना सोनवणे यांनी बनवले होते. (Photo- Indian Express)
-
रंजना ही महाराष्ट्रातील महिला आहेत. त्या काळात त्यांचे वास्तव्य महाराष्ट्रातील नंदुबार जिल्ह्यातील तांबळी येथे होते.
-
यूपीए सरकारच्या काळात महाराष्ट्रातील नंदुबार जिल्ह्यातील तांभाली गावातून आधार कार्ड बनवण्याची सुरुवात झाली. पहिले आधार कार्ड सोनिया गांधी आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत रंजना सोनवणे यांना देण्यात आले.
-
रंजना सोनवणे या भारतातील पहिले आधार कार्ड मिळवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.
-
भारतात मोठ्या संख्येने लोकांकडे त्यांचे आधार कार्ड आहे. शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या सर्वांना याची गरज आहे. आधार कार्ड आल्याने देशात पारदर्शकता आली आहे.

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”