-
प्रत्येकाच्या आयुष्यात पैशाला फार महत्त्व असते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येकजण पैसे कमावण्यासाठी धडपड करत असतो.
-
पण अनेकदा दिवसरात्र मेहनत करुनही पैसा टिकत नाही. यामुळे आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो.
-
आपल्यातील अनेकजण हे पाकिटात पैशांसोबतच इतरही गोष्टी ठेवतात. पण याच गोष्टी तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकतात.
-
ज्योतिषशास्त्रानुसार, जर तुम्ही काही गोष्टी पर्समध्ये नियमित ठेवत असाल तर तुमचे निश्चित आर्थिक नुकसान होऊ शकते. तसेच यामुळे तुमच्या आरोग्यावरही त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.
-
जुने बिल : आपल्यातील अनेकांना कपडे, वस्तू यांसारख्या खरेदी केलेल्या गोष्टींची बिल पर्समध्ये ठेवण्याची सवय असते. पण ज्योतिष शास्त्रानुसार जुने बिल पर्समध्ये ठेवणे योग्य मानलं जात नाही. यामुळे नकारात्मकता वाढते.
-
विशेष म्हणजे जुने बिल पर्समध्ये ठेवल्यामुळे तुमचे अनावश्यक खर्च वाढतात. त्यामुळे तुमचे आर्थिकदृष्ट्या नुकसान होते.
जर तुम्ही एखाद्याच्या कर्जाची रक्कम परत करण्यासाठी जात असाल किंवा कोणाकडून कर्ज घेतलेली रक्कम घेऊन येत असाल तर ते पैसे कधीही पर्समध्ये ठेवू नका. यामुळे तुमच्या कर्जामध्ये अजून वाढ होते. अनेकजण त्यांच्या कुटुंबातील मृत्यू झालेल्या व्यक्तींचे फोटो पर्समध्ये ठेवतात. पण असे अजिबात करु नये. यामुळे वास्तूदोष निर्माण होतो. तसेच यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. पर्स किंवा पाकिट हे लक्ष्मी देवीचे स्थान मानले जाते. त्यामुळे त्यात फक्त पैसे ठेवावेत. विशेष म्हणजे पाकिटात देवाचे चित्र असलेला कोणताही कागद किंवा त्यासंबंधित वस्तू ठेवू नये. यामुळे तुमच्या कर्जात आणखी वाढ होऊ शकते. -
पर्समध्ये चावी ठेवणेही टाळावे. त्यामुळे सतत पैशांची हानी होते.
-
तुम्ही पर्समध्ये एखादी चांदीची वस्तू ठेवू शकता. पण त्याशिवाय इतर कोणतीही गोष्टी त्यात ठेवू नये. (सर्व फोटो – pixabay)

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादलं आणि पाकिस्तानला गोंजारलं; तेल आयातीसंदर्भात करार!