-
अनेक जणांना रात्रीच्या जेवणानंतर पोट फुगणे किंवा गॅसची समस्या उद्भवते.
-
जर तुम्हाला नेहमी हा त्रास होत असेल तर काही घरगुती उपाय करून तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवु शकता. कोणते आहेत हे घरगुती उपाय जाणून घ्या.
-
जेवणात बदल करा : रात्रीच्या वेळी जड अन्नपदार्थ खाल्ल्याने अन्नपचन नीट होत नाही. त्यामुळे पोट फुगणे किंवा गॅस होण्याची समस्या उद्भवू शकते.
-
यासाठी रात्रीच्या जेवणात हलक्या अन्नपदार्थांचा समावेश करा. हलके अन्नपदार्थ खाल्ल्यास ते लगेच पचतात आणि गॅसच्या समस्येपासून सुटका मिळु शकते.
-
जेवल्यानंतर शतपावली करा : जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे अन्नपचन नीट होत नाही. त्यामुळे गॅसची समस्या उद्भवू शकते.
-
यामुळे रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करा म्हणजे थोडा वेळ चाला, यामुळे अन्नपचन नीट होईल.
-
ॲप्पल सायडर व्हिनेगर : ॲप्पल सायडर व्हिनेगरचे सेवन केल्याने गॅसची समस्या टाळता येऊ शकते.
-
यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा ॲप्पल सायडर व्हिनेगर मिसळून प्यायल्यास गॅसची समस्या कमी होण्यास मदत होते.
-
रात्री चहा, कॉफी पिणे टाळा : रात्री चहा किंवा कॉफी प्यायलाने गॅसची समस्या उद्भवू शकते. कारण चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन असते.
-
कॅफिन असलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने अन्नपचन नीट होत नाही, त्यामुळे गॅस होऊ शकतो.
-
तज्ञांच्या मते संध्याकाळी सहा नंतर कॅफिन, निकोटीन यांचा समावेश असणाऱ्या पदार्थांचे सेवन टाळावे. कारण यामुळे पचनक्रिया बिघडण्यासोबतच झोपेसंबंधित आजार होण्याची शक्यता असते.
-
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला द्या.) (सर्व फोटो सौजन्य : Freepik)

“पाकिस्तानने भारतीय लष्करी तळांना लक्ष्य केल्यामुळेच लहारोमधील रडार उद्ध्वस्त”, परराष्ट्र मंत्रालयाने मांडली भूमिका