-
सुंदर लांब केस प्रत्येकाला आवडतात.
-
मात्र अपुरा आहार, बदलती जीवनशैली यामुळे केसगळतीची समस्या सुरू होते आणि केस भरपूर गळू लागतात.
-
शरीरात जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या कमतरतेमुळे केस गळण्याची समस्या जास्त होते.
-
झिंकच्या कमतरतेमुळे केसगळती वाढते.
-
अशा स्थितीत झिंकयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.
-
केस निरोगी, मुलायम आणि लांब करण्यासाठी झिंक युक्त आहार घ्या.
-
मशरूम खाल्ल्याने झिंक, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि प्रोटीनची कमतरता पूर्ण होते.
-
अंड्यातील पिवळ बलक खाल्ल्याने झिंकची कमतरता भरून काढता येते. यामध्ये झिंक, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन बी12, थायामिन, व्हिटॅमिन बी6, फोलेट आणि फॉस्फरस सारखे घटक आढळतात.
-
काजूमध्येही झिंक आढळते. काजूमध्ये तांबे, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए आणि फोलेट देखील असतात, ज्यामुळे केस मजबूत होतात.
-
तीळ केसांसाठी चांगले असतात. तिळामध्ये झिंक, प्रोटीन, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स, फॉलिक अॅसिड आणि बी कॉम्प्लेक्स असतात.
-
झिंकची कमतरता भरून काढण्यासाठी रोज लसूण खा. लसूण हे जीवनसत्त्वे अ, ब आणि क, आयोडीन, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखे पोषक तत्व प्रदान करते.
-
झिंकच्या कमतरतेवर मात करण्यासाठी शेंगदाणे खा.लोह, पोटॅशियम, फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि फायबर देखील मिळतात.

तब्बल ५०० वर्षांनंतर शनिदेवांची मोठी चाल! ‘या’ ३ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडणार, करिअर आणि व्यवसायात होणार प्रगती