-
रोज सकाळी लवकर उठणे अनेकजणांना कठीण जाते. अलार्म बंद करून आणखी काही मिनिटं झोपता यावे असे वाटते. रोजच्या प्रवासाची दगदग, कामाचा ताण यामध्ये पुरेशी झोप न मिळणे साहजिक आहे, त्यात ८ तास झोप मिळाली तरी काहीजणांना सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो.
-
मग पटकन चहा, कॉफी पिऊन किंवा अंघोळ करुन हा थकवा घालवला जातो. जर असा थकवा सतत जाणवत असेल तर, याचा तुमच्या मूडवर आणि काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
-
तसेच काहीजणांना झोप पूर्ण झाली तरी सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो.
-
काही सवयींमुळे सकाळी उठल्यावर हा थकवा जाणवू शकतो, कोणत्या आहेत त्या सवयी जाणून घ्या.
-
झोपेत असताना अलार्म वाजला की तो बंद करून पुन्हा झोपण्याचा मोह अनेकांना अनावर होतो. पण यामुळे तुम्हाला अधिक थकवा जाणवू शकतो. कारण यामुळे गाढ झोपेवर परिणाम होतो. तुम्ही जागे होऊन अलार्म बंद करून पुन्हा झोपता, या सवयीमुळे तुम्हाला गाढ झोप लागण्याचे प्रमाण कमी होऊ शकते आणि उठल्यानंतर थकवा जाणवू शकतो.
-
कॅफीनयुक्त पदार्थ (उदा. चहा, कॉफी), अल्कोहोल यांमुळे शरीरातील नर्वस सिस्टिम उत्तेजित होते. त्यामुळे गाढ झोपेवर परिणाम होतो आणि सकाळी उठल्यावर थकवा जाणवू शकतो.
-
तुमच्या क्रोनोटाईपनुसार झोपेची वेळ निवडणे आवश्यक आहे. क्रोनोटाईप म्हणजे काही जणांना रात्री गाढ झोप लागते, तर काहींना सकाळी. झोपेच्या या विशिष्ट सवयीला क्रोनोटाईप म्हणतात.
-
तुम्ही ज्या खोलीत झोपता तिथल्या वातावरणाचा देखील झोपेवर परिणाम होतो. त्या खोलीतील तापमान, लाईट हे झोप पूर्ण न होण्यास कारणीभूत ठरू शकतात आणि त्यामुळे सकाळी थकवा जाणवू शकतो.
-
झोप पूर्ण न होण्यामागे ‘स्लीप डिसऑर्डर’ हे कारण देखील असु शकते. इनसोमनिया, नार्कोलेप्सी, स्लीप ॲप्निया हे ‘स्लीप डिसऑर्डर’ चे काही प्रकार आहेत. या आजारांमुळे झोप पूर्ण न होत असल्याने आळस जाणवू शकतो. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. (फोटो सौजन्य : Freepik)

Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य; “ठाकरे-पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न, पण मी लिहून देतो…”