-
वैदिक ज्योतिषशास्त्रात ‘गजकेसरी राजयोग’ अत्यंत शुभ मानला जातो. असे म्हटले जाते, ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा राजयोग तयार होतो. त्या व्यक्तीला सर्व भौतिक सुखे प्राप्त होतात. ती व्यक्ती समाजात लोकप्रिय होते.
-
३१ डिसेंबरच्या संध्याकाळी ‘गजकेसरी राजयोग’ तयार होणार आहे. गुरू ग्रह आणि चंद्र यांच्या संयोगातून हा योग तयार होणार असून या राजयोगाच्या निर्मितीमुळे तीन राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. या कोणत्या राशी आहेत ते जाणून घेऊया.
-
कर्क राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग शुभ सिद्ध होऊ शकतो. कारण हा योग त्यांच्या संक्रमण कुंडलीच्या नवव्या घरात तयार होणार आहे. म्हणूनच यावेळी या लोकांना प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळू शकते.
-
यासोबतच या लोकांना वडिलोपार्जित संपत्तीचे सुख मिळू शकते. या काळात अविवाहित मुला-मुलींना विवाहाची संधी मिळू शकते. त्याच वेळी, ते व्यवसायाच्या संदर्भात एक लहान किंवा मोठा प्रवासदेखील करू शकतात.
-
जे विद्यार्थी तेथे आहेत, त्यांना यावेळी परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते.
-
मिथुन राशीच्या लोकांना गजकेसरी राजयोग करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल ठरू शकतो. कारण या राशीतून दशम स्थानात हा योग तयार होणार आहे.
-
त्यामुळे येणाऱ्या वर्षात बेरोजगारांना नोकरीच्या ऑफर येऊ शकतात. तसेच, भागीदारीत काही काम सुरू करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही वेळ चांगली आहे. (Pexels)
-
या दिवसांमध्ये तुमची चांगली कमाईही होऊ शकते. जे नोकरी करतात त्यांची कामाच्या ठिकाणी प्रशंसा होऊ शकते. (Pexels)
-
वृषभ राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग पैशाच्या बाबतीत शुभ सिद्ध होऊ शकतो. या राशीतून अकराव्या घरात हा योग तयार होणार आहे. त्यामुळे या लोकांचे उत्पन्न वाढू शकते.
-
यासोबतच या राशीचे लोक उत्पन्नाच्या नवीन माध्यमांतून पैसे कमवण्यात यशस्वी होऊ शकतात. त्याच वेळी, चालू असलेल्या कोणत्याही कर्जातून मुक्तता होण्याची शक्यता आहे.
-
घर किंवा वाहन घेण्याचा प्रयत्न करत असणाऱ्यांची इच्छादेखील या काळात पूर्ण होऊ शकते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहितके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”