-
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतात. याचा सर्वच राशीच्या लोकांवर परिणाम होतो. ग्रहांचा हा बदल काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ सिद्ध होऊ शकतो.
-
ज्योतिषशास्त्रानुसार, मार्चमध्ये चार ग्रहांच्या चाली बदलणार आहेत. यावेळी मंगळ मिथुन राशीत प्रवेश करेल. तर शुक्र मेष राशीत प्रवेश करेल. तसेच १५ मार्च रोजी सूर्य देव मीन राशीत प्रवेश करतील.
-
तर दुसऱ्या दिवशी बुधही मीन राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार, या ग्रहांची स्थिती सर्व राशीच्या लोकांवर प्रभाव टाकेल. पण चार राशीच्या लोकांना या काळात काळजी घेणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
-
ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीच्या लोकांनी मार्च महिन्यात थोडी काळजी घ्यावी. कारण या राशीचा स्वामी ग्रह मंगळ शत्रू राशीत आहे. दुसरीकडे, मंगळ या राशीतून तिसऱ्या घरात स्थिर असेल. त्याच वेळी, राहु ग्रह ३० ऑक्टोबरपर्यंत या राशीमध्ये विराजमान राहील. त्यामुळे वैवाहिक जीवनात मानसिक अस्वस्थता, तणाव, समस्या असू शकतात.
-
पण शनिदेव या राशीच्या लाभ घरात विराजमान आहेत. त्यामुळे आर्थिक चणचण भासणार नाही. पण तब्येत थोडी नरम राहू शकते. मुलांना काही त्रास होऊ शकतो. तसेच गर्भवती महिलांना काही समस्या जाणवू शकतात. यावेळी आपल्या जोडीदाराच्या आरोग्याचीही काळजी घावी.
-
मार्च महिना कर्क राशीच्या लोकांसाठी थोडा हानिकारक ठरू शकतो. कारण कर्क राशीत पाश्विक योग तयार झाला आहे. म्हणूनच मार्चची सुरुवात या राशीच्या लोकांसाठी तणावपूर्ण असण्याची शक्यता आहे.
-
त्याच वेळी, हे लोक आपल्या करिअरबद्दल थोडे चिंतित राहू शकतात. तसेच, कामाच्या ठिकाणी बॉसशी समन्वय साधला पाहिजे. परंतु जे विद्यार्थी अभियांत्रिकी किंवा इतर कोणत्याही परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी १२ मार्चपर्यंतचा कालावधी चांगला ठरू शकतो. दुसरीकडे, शनिदेवाचा उदय होताच आरोग्य सुधारू शकते.
-
तूळ राशीच्या लोकांसाठी मार्च महिना काहीसा प्रतिकूल ठरू शकतो. कारण केतू ग्रह तूळ राशीत आहे. या राशीचा स्वामी शुक्र असल्याने यावेळी या लोकांना दुखापत, ऑपरेशन आणि अपघात होण्याची शक्यता आहे.
-
दुसरीकडे १२ मार्चनंतर तब्येत सुधारू शकते. यासोबतच नोकरी-व्यवसायात सुधारणा होऊ शकते. मात्र, पाश्विक योग आणि मांगलिक योग तयार झाल्याने जीवनात उलथापालथ होण्याची संभावना आहे. १७ मार्चपासून थोडी विश्रांती मिळू शकते.
-
मकर राशीच्या लोकांसाठी मार्च महिना काहीसा हानीकारक ठरू शकतो. कारण या राशीच्या संक्रमण कुंडलीतील धन गृहावर शनिदेव विराजमान आहेत. त्यामुळे या लोकांच्या आरोग्यावर आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच कुटुंबातील सदस्यासोबत वाद होऊ शकतो.
-
या लोकांना डोळ्यांचा त्रास होऊ शकतो. १५ मार्चपासून सूर्यदेव विभक्त होणार असल्याने ही कठीण स्थिती १७ मार्चपर्यंत राहू शकते. त्याचबरोबर आईसोबत तणाव असू शकतो. आईची तब्येत बिघडू शकते. भावा-बहिणींचे सहकार्य मिळू शकते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (File Photos)

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक