-
एप्रिल महिना सुरु झाल्यापासून उन्हाचा प्रभाव वाढला आहे. वातावरणामध्ये होणाऱ्या बदलामुळे प्रत्येकजण उन्हापासून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहे.
-
उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन, सनस्ट्रोक अशा गोष्टींचा धोका असतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने या समस्या उद्भवतात. मुबलक प्रमाणात पाणी प्यायल्याने या गोष्टी टाळता येतात.
-
आपली त्वचा उन्हापासून जास्त प्रभावित होत असते. यामुळे उन्हाळ्यात स्कीन केअरवर बरेचसे लोक भर देत असतात. उन्हामुळे त्वचेवर परिणाम होऊ नये यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात.
-
प्रखर सूर्यकिरणांमुळे डोळ्यांना त्रास होत असतो. ही किरणे अतिनील (ultraviolet) स्वरुपाची असतात. उन्हाळ्यात डोळ्यांना त्रास होण्याचे प्रमाण जास्त असते. या काळात डोळ्याची निगा राखण्यासाठी काही उपाय करता येतात. या उपाया विषयीची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
-
उन्हापासून डोळ्यांचा बचाव व्हावा यासाठी सनग्लासेस वापरणे खूप फायदेशीर असते. यामुळे सूर्याची प्रखर अतिनील किरणे डोळ्यांपर्यंत पोहचत नाहीत. परिणामी डोळ्यांना त्रास होत नाही.
-
शरीरामध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो. हे घडू नये यासाठी ठराविक कालावधीनंतर पाणी प्यावे. यामुळे डिहायड्रेशनचा धोका टळतो.
-
उन्हाळ्यात फोटोकेरायटिसचा (Photokeratitis) धोका वाढतो. हा त्रास होऊ नये यासाठी उन्हात जाणे टाळावे. महत्त्वाचे काम असल्यास सनग्लासेस, टोपी तसेच छत्रीचा वापर करावा.
-
वातावरण गरम झाल्याने डोळे आणि त्यांच्या आसपासचा भाग कोरडा होऊ शकतो. असे घडू नये म्हणून ठराविक कालावधीनंतर डोळे थंडगार पाण्याने धुवावेत.
-
शारीरिक-मानसिकरित्या निरोगी राहण्यासाठी किमान ७-८ तास झोप घेणे आवश्यक असते. योग्य प्रमाणात झोप घेणे डोळ्यांसाठी फायदेशीर असते. यामुळे ते फ्रेश राहतात. याशिवाय आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा समावेश केल्याने डोळे निरोगी राहण्यास मदत होते.

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”